खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ३८ दिवसात जामीन मंजूर.

Ahmednagar Breaking News
0

 खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ३८ दिवसात जामीन मंजूर.


ॲडव्होकेट.महेश तवले.

अहमदनगर, प्रतिनिधी.- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ३८ दिवसात अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर.नातू साहेब यांच्या कोर्टात जामीन मंजूर झाला.घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, राहुरी येथील विलास नारायण कांबळे यांची आरोपी नामे भाऊसाहेब किसन वाघमारे यांची चप्पल शिवण्याचे कारणावरुन भांडण झाले होते, त्यावेळी आरोपी वाघमारे यांनी चपलेला खिळा ठोकण्याची लोखंडी हस्ती हातात घेऊन विलास कांबळे यांच्या डोक्यात व डोळ्यावर मारुन जबर जखमी केले होते. त्यानंतर विलास कांबळे याला ग्रामीण रुग्णालय वांबोरी येथे उपचाराकरीता दाखल केले होते. त्यानंतर त्याला डोळ्याला जास्त मार लागल्याने सिव्हील हॉस्पीटल येथे ॲडमीट करण्यात आले, त्यानंतर दि.२९/९/२२.रोजी त्यांना नोबल हॉस्पीटल येथे ॲडमीट केले.त्यावेळी ते मयत झाले.अशाप्रकारे गुन्हा राहुरी पो.स्टे. येथे दि. ३०/९/२०२२ रोजी दाखल झाला होता.सदर गुन्ह्यातील आरोपीस पोलीसांनी अटक केली. सदर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर येथे .ॲड महेश तवले, ॲड. संजय दुशिंग व ॲड .अक्षय दांगट यांचे मार्फत अर्ज केला.सदर अर्जाचे कामी आरोपीचे वकीलांनी युक्तीवाद करुन आरोपीची बाजु मांडली व जखमी हा उपचार घेऊन बरा झाला होता व तो आरोपीने केलेल्या मारहानीमुळे मयत झालेला नाही अशी बाब मा. न्यायालयाचे निदर्षनास आणुन दिली. सरकार पक्षातर्फे आरोपीला तपास चालु असल्याने जामीन देवू नये अशी मागणी करण्यात आली, परंतू दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण मा. न्यायालयाने आरोपी नामे भाऊसाहेब किसन वाघमारे यास जामीनावर खुले केले.आरोपीतर्फे ॲड.महेश तवले, ॲड.संजय दुशिंग व ॲड.अक्षय दांगट,अहमदनगर जिल्हा न्यायालय यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top