मनपाने नागरिक, नगरसेवकांवर आंदोलनाची वेळच येऊ देऊ नये - माजी नगरसेवक निखिल वारे.

Ahmednagar Breaking News
0

मनपाने नागरिक, नगरसेवकांवर आंदोलनाची वेळच येऊ देऊ नये - माजी नगरसेवक निखिल वारे.

नगर, प्रतिनिधी. - अहमदनगर महानगरपालिकेने नागरिकांकडून घेतलेल्या करापोटी नागरी सुविधा देणे हे काम आहे. ते काम चोखपणे पार पाडले तर नागरिकांना तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. नगरसेवक व नागरिक यांच्यात सुसंवाद होत असतो .पण मनपाच्या चुकीच्या कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांवर, नगरसेवकांवर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तेव्हा मनपाने आंदोलनाची वेळच आमच्यावर येऊ देऊ नये. अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिली.                                   

          1 नोव्हेंबर 2022 पासून नगर शहर व उपनगरात कचरा संकलन व इतर कामांसाठी जेसीबी उपलब्ध असताना देखील केवळ ड्रायव्हर नसल्याने लाखो रुपयांचे यंत्रसामुग्री धुळखात पडून राहिल्याने श्री वारे यांनी दोन दिवसात ड्रायव्हर उपलब्ध झाले नाही तर आंदोलन करणार असा इशारा देताच रविवारी शहर व उपनगरातील प्रभागात जेसीबी द्वारे कचरा उचलण्याचे काम सुरू झाल्याने नागरिक सुखावले आहे.                                    अहमदनगर महानगरपालिकेने याबाबत तातडीने दखल घेऊन ड्रायव्हर उपलब्ध करून जेसीबी द्वारे साफसफाई चे कामे ,खोदाईची कामे सुरू केल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे श्री वारे यांनी आभार मानले.नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे हे प्रशासनाचे कामच आहे. ही जाणीव ठेवून आपले काम चोखपणे पार पाडावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही केलेल्या कामामुळे नागरिकांना मनपाकडे तक्रार करण्यास वाव नसतो.मात्र काही वेळेस मनपाच्या काही चुकांमुळे नागरिकांची नाराजी व रोष याला सामोरे जावे लागते. तेव्हा मनपाने रोजच्या रोज असलेली सफाईची कामे सुरळीतपणे पार पाडल्यास नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. असे श्री.वारे यांनी सांगितले.      

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top