भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई.मुकुंदनगर मध्ये गोमांसाची विक्री करणाऱ्यां तीन आरोपींवर गुन्हा दाखल.

Ahmednagar Breaking News
0

भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई.- मुकुंदनगर मध्ये गोमांसाची विक्री करणाऱ्यां तीन आरोपींवर गुन्हा दाखल.


 


नगर,प्रतिनिधी (२ नोव्हेंबर) : दि. 02/11/2022 रोजी भिंगार कॅम्प सहा.पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,मुकुंदनगर परीसरात मुकुंदनगर भागात इनाम मस्जिद जवळ,नगर कॉम्प्लेक्स जवळ,आर.आर. बेकरी समोर,हिना पार्क येथे पत्र्याचे शेड येथे दुकाना मध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावराचे कत्तल करण्याची मनाई असतांना ही गोवंशी जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करुन गोमांसाची दुकानामध्ये विक्री करत आहेत.आत्ता गेल्यास मिळुन येतील अशी बातमी मिळाल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोहेकाँ/215 विलास गारूडकर,पोहेकाँ/1175 दिलीप झरेकर,पोहेकाँ/760 अजय नगरे,पोना/2178 आर.आर द्वारके,पोना/308 गणेश साठे,पोना/1072 राहुल गोरे,पोना/1407 भानूदास गौतम खेडकर,पोना / 1764 सचिन धोंडे,चापोकाँ/631 भागचंद लगड, चापोकाँ /989 संजय काळे अशांनी मुकुंदनगर परीसरात इनाम मस्जिद जवळ,नगर कॉम्प्लेक्स जवळ, आर.आर.बेकरी समोर,हिना पार्क येथे पत्र्याचे शेड येथे छापा टाकून कारवाई केली.कारवाई दरम्यान 60,300 /- रू किं चे अंदाजे 335 किलो गोमांस मिळून आले तसेच वजन काटे,वजन मापे,गोमांस कापण्यासाठी लागणारे साहीत्य,तसेच एक खिमा काढण्याचे लोखंडी मशिन त्यास इलेक्ट्रीक मोटर लावलेली जुवाकिंअं.असा एकून 70,300 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भिंगार कॅम्प पोस्टे.ला गुरनं 501/2022 भा.द.वी.क  269,34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारणा) सन 2015 चे कलम 5 (क), 9(अ) प्रमाणे 1).रमीज राजमोहम्मद शेख वय 22 वर्षे रा.वाबळे कॉलनी,मुकुंदनगर ता.जि.अहमदनगर 2). वसीम मोहम्मद कुरेशी वय 26 वर्षे रा.घर नं 37,सदर बाजार,भिंगार ता.जि.अहमदनगर 3)जाकीर गुलामनबी कुरेशी वय 38 वर्षे रा.हमालवाडा,नालबंद खुंट ता.जि. अहमदनगर यांचे विरूद्ध पोना/308 गणेश साठे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.पुढील कारवाई पोना/1407 भानूदास खेडकर हे करीत आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top