अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवले नगर, गुलमोहर रोड मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

Ahmednagar Breaking News
0

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवले नगर, गुलमोहर रोड मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.


नगर,प्रतिनिधी.(२५.नोव्हेंबर.) : नवले नगर, गुलमोहर रोड मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले,  नगरसेविका सौ.ज्योती गाडे,प्रकाश भागानगरे, स्वप्निल शिंदे,मा.नगरसेवक निखिल वारे, उद्योजक अमोल गाडे, अमित गटणे, महेश कुरे, सुरज कुरलीये, ऋषिकेश देशमुख,  सचिन भिंगारकर आदि नागरिक उपस्थित होते.     


         आ.संग्राम जगताप म्हणाले आपल्या परिसरातील रस्त्यांची कामे होत आहेत, तरी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईट पट्ट्यामध्ये नागरिकांनी आपापल्या परिसरात झाडे लावून त्याचे संगोपन करायला हवे.जसे गुलमोहररोडच्या नावाप्रमाणे त्या एरियामध्ये अगोदर गुलमोहराची झाडे होती, ती आता फारशी दिसायला मिळत नाही, तरी प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरात झाडांचे संगोपन करायला हवे.

         नगरसेविका सौ. ज्योती गाडे म्हणाल्या,उपमहापौर गणेश भोसले यांनी आम्हाला वारंवार आमच्या वॉर्डातील विकास कामांसाठी मदत केली आहे, तसेच वार्डातील मोठमोठ्या प्रलंबित विकास कामांसाठी अजून निधी देण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे.प्रा.विलास वाळुंजकर यांनी आभार मानले.


          यावेळी परिसरातील बप्पासाहेब बोडखे,राजेंद्र मगर, कुमार नवले, संतोष  रोडगे, संतोष होळकर, प्रा.विलास वाळुंजकर, चंद्रशेखर खिस्ती, विनोद भिंगारे, आदिनाथ म्हस्के, बाळासाहेब जोगदंड,विशाल सावंत, तुकाराम मचे,शिवाजी निंबाळकर, सुभाष खरमाळे, योगेश खरमाळे, कैलास होनराव, राहुल लिमये,महिलांमध्ये सुवर्णा मगर,स्वाती खिस्ती, अंबिका रोडगे, जयश्री होळकर, निता वाळुंजकर, योगिता धायगुडे, कांता बोडखे आदि महिला उपस्थित होत्या.

        

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top