तिरट जुगार खेळणारे 04 जणांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी केली कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

तिरट जुगार खेळणारे 04 जणांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी केली कारवाई. 

नगर,प्रतिनिधी.(01.डिसेंबर.) : भिंगार कॅम्प सहा.पोलीस निरीक्षक श्री शिशिरकुमार देशमुख सो यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, नगर पाथर्डी रोड वरील घास गल्ली कडे जाणारे रोडचे शेजारील बंद दुकानाचे आडोशाला काही इसम तिरट नावाचा हारजितीची जुगार खेळत आहे अशी बातमी मिळाल्याने सपोनी देशमुख सो यांनी तसेच पोहेकाँ/215 विलास गारूडकर, पोहेकाँ/760 अजय नगरे, पोना/2178 राहुल द्वारके, पोना/1072 राहुल गोरे, पोना/1407 भानूदास खेडकर, पोकाँ/810 अमोल आव्हाड, चापोकाँ/841 अरूण मोरे अशांना सदर ठिकाणी जावून कारवाई करणे कामी आदेश दिल्याने वरील पोलीस स्टाफ व पंच अशांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 1. सुभाष हरीचंद कोरी वय 59 वर्षे धंदा नोकरी रा.गजराज नगर,नगर औरंगाबाद रोड ता. जि.अहमदनगर 2. राजु उमाजी भिंगारदिवे वय 51 वर्षे धंदा मजुरी रा.भिम नगर, भिंगार ता. जि.अहमदनगर 3. लतीफ शेख दाऊद वय 60 वर्षे धंदा काही नाही रा.मोमीन गल्ली, भिंगार ता.जि. अहमदनगर 4. अशोक विठ्ठल त्रिंबके वय 70 वर्षे रा.खळेवाडी भिंगार ता.जि.अहमदनगर असे तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल, मोपेड गाडी, रिअर रिक्षा अशा प्रकारचा एकून 1,19,245 रू किं चा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांचे विरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना/2178 राहुल द्वारके हे करीत आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशात खैरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील सो, यांचे मार्गदर्शना खाली सपोनी/शिशिरकुमार देशमुख,पोहेकाँ/215 विलास गारूडकर, पोहेकाँ/760 अजय नगरे, पोना/2178 राहुल द्वारके, पोना/1072 राहुल गोरे,पोना/1407 भानूदास खेडकर, पोकाँ/810 अमोल आव्हाड, चापोकाँ/841 अरूण मोरे यांनी सदरची कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top