नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामे करण्यास आम्ही कटीबद्ध - सुनिल त्र्यंबके.
प्रभाग 2 मधील पोलिस कॉलनीत ड्रेनेज कामाचा शुभारंभ.
नगर, प्रतिनिधी.(१२.डिसेंबर.) : प्रभागातील नागरिकांना चांगले रस्ते, मुबलक पाणी, स्ट्रीट लाईट, स्वच्छता आदि कामे नियमित होणे अपेक्षित असते. प्रभाग दोन मधील आम्ही चारही नगरसेवक नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामे करत आहे. चांगल्या दर्जाच्या मुलभुत सुविधा देण्यावर आमचा भर राहिला आहे. जेवढा मोठा प्रभाग तेवढाच विकास कामांना प्राधान्य देत भविष्यात देखील आणखी विकास कामे करुन आदर्श प्रभाग करण्यास आम्ही प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
नगर-औरंगाबाद रोडवरील तवलेनगर मधील पोलिस कॉलनीत बंद गटार पाईप योजनेचा शुभारंभ नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, वसंत दरंदले, भगवान गांगर्डे, संजय ढवळे, भाऊसाहेब गडाख, दिलीप हुजबंद, राजेंद्र गायकवाड, अर्जुन आव्हाड, मधुकर दरंदले, मीना कुदळ, कांचन आंधळे, सुनिता डाके, अलका राजपूत, प्रतिभा गवारे, लता कुर्हे, प्रतिमा सूर्यवंशी आदिंसह नागरिक उपस्थित होते.
नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निधीतून तसेच मनपाच्या माध्यमातून आम्ही निधीच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न सोडविले याचे समाधान वाटते. प्रलंबित असलेले प्रश्न नियोजनबद्ध व कायमस्वरुपी सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे सांगितले.
यावेळी नागरिकांनी प्रश्न सोडविल्याबद्दल नगरसेवकांचे आभार मानले. निखिल वारे यांनी नागरिकांना आवाहन केले की हे ड्रेनेजचे काम होत असतांना सर्वांनी सहकार्य करावे, दर्जाबाबत जागरुक रहावे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी बाळासाहेब पवार, विनित पाउलबुधे यांनी आपल्या मनोगतात मुलभुत प्रश्नांपासून विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. टप्याटप्प्याने सर्व कामे पूर्ण होतील, असे सांगितले.