सुरेगाव हत्याकांड,दरोडा प्रकरणातील दहा आरोपींची निर्दोष मुक्तता.- जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.
श्रीगोंदा,प्रतिनिधी. (०१. डिसेंबर.) : राज्या खळबळ उडवून देणाऱ्या सुरेगाव (ता. श्रीगोंदा) येथील चार जणांचे हत्याकांड आणि दरोडा यातील दहा आरोपीची श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल बुधवार ३०. नोव्हेंबरला दिला.सुरेगाव परिसरात २० ऑगस्ट २०२० रोजी स्वस्तात सोने फसवणूक प्रकरणात नाभीक कुंज्या चव्हाण,नागेश कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, लिखया हबया काळे (रा.सुरेगाव, ता. श्रीगोंदा )यांची जळगाव येथील चार आरोपीनी हत्या केली होती.
हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश जगदीश सोनवणे, कल्पना किशोर सपकाळ, आशाबाई जगदीश सोनवणे, प्रेमराज रमेश पाटील (रा.जळगाव) या आरोपींची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे
तसेच जळगाव येथील चौघांना सोन्याचे आमिष दाखवून ३ लाख १५ हजाराची फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपी शबरी कुंज्या चव्हाण, अक्षदा ज्या चव्हाण, जावेद घडयाळ्या चव्हाण, महावीर चव्हाण, शंभ्या कुंज्या चव्हाण, विशाल अशोक भोसले (रा. सुरेगाव रा.श्रीगोंदा) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हत्याकांड प्रकरणातील आरोपींची बाजू ऍड.महेश तवले, ऍड.संजय दुशिंग, ऍड.अनिकेत भोसले तर दरोडा प्रकरणातील आरोपींची बाजू ऍड.संग्राम देशमुख यांनी मांडली.