बद्री फूड्सच्या संचालिका सौ.कविता कृष्णा पेंडम यांना "राज्यस्तरीय उद्यम हिरकणी"पुरस्कार प्रदान.

Ahmednagar Breaking News
0

बद्री फूड्सच्या संचालिका सौ.कविता कृष्णा पेंडम यांना "राज्यस्तरीय उद्यम हिरकणी"पुरस्कार प्रदान.

नगर, प्रतिनिधी. : संपूर्ण महाराष्ट्रातून बद्री फूड्स च्या शुद्ध तेलासाठी उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, अल्पावधीतच ISO मानांकन घेऊन शुद्धता आणि विश्वसनीय कामगिरीने प्रभावित केले आहे, आणि म्हणूनच बद्री फूड्सच्या संचालिका सौ. कविता कृष्णा पेंडम यांना UDYAM यांच्यावतीने राज्यस्तरीय उद्यम हिरकणी पुरस्कार मा.श्री. बी. टी. यशवंते( सहसंचालक, उद्योग संचालनालय, उद्योग विभाग महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी महिला सबलीकरण सक्षमीकरण अंतर्गत अनेक महिला अश्या प्रकारचे यशस्वी उद्योग करणाऱ्या विशेषतः महिला उद्योजिकाचां सत्कार करण्यात आला.श्री यशवंते साहेबांनी शासन स्तरावरील अनेक उद्योग मध्ये आता महिला पुढे येऊन स्वतःचा बळावर आपले कुटुंब सांभाळून यशस्वी होताना दिसत आहेत, त्यामुळेच उद्यम कडून दिला जाणाऱ्या हिरकणीचा पुरस्कारला राज्यस्तरीय पुरस्कार म्हणून महत्व प्राप्त झाल्याचे नमूद केले तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एक उद्योगाचे जाळे तयार झाल्याचे दिसून येत असल्याने त्यांना प्रोत्साहन देऊन महिलांना उद्योग निर्मितीसाठी, उद्योगाच्या उभारणीसाठी प्रकल्प अहवाल पासून मार्केटिंग पर्यंत बँकेचे सर्व माहिती देखील यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये अनेक उद्योग क्षेत्रातले नामांकित व्यक्तींनी आपापले यशोगाथा देखील सांगितले, साठी उद्यम चे डायरेक्टर श्री उल्हास भाले यांनी अनेक उद्योजक महिलांना यशस्वी उद्योगाचे धडे व प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारची माहिती दिली, या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

     

            आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा घाण्यावरील शुध्द नैसर्गिक तेलाचे उत्पादन श्री बद्री Agro Food Product ने नैसर्गिकरित्या उत्पादीत केलेल्या शेंगदाणा, सुर्यफुल, करडई, तील, मोहरी, जवस आदी तेलाच्या विक्री सेवेस अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फर्त प्रतिसाद मिळत आहे.

      या प्रसंगी उद्दम इन्फो. सोल्युशनचे संचालक श्री उल्हास भाले यांनी श्री बद्रि products चे शुद्धता, गुणवत्ता व क्वालिटीमुळे तसेच ग्राहकांची आवड ओळखून आपल्या व्यवसायात केलेले आमूलाग्र बदल, सोशल मीडियाचा वापर करीत ग्राहकांची मोठी साखळी तयार केल्याने अल्पावधीतच यशस्वी पदार्पण केल्याचे कौतुक केले या कार्यक्रमास नागपूर, पुणे कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, बीड, नाशिक, नांदेड, गोदिया, गडचिरोली व इतर जिल्हयातील पुरस्कार प्राप्त उद्योजिका व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था च्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.

 या पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून श्री बद्रि प्रोडक्ट्सचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top