अखेर आमदार निलेश लंकेंचे उपोषण मागे.

Ahmednagar Breaking News
0

केंद्रीय मंत्री गडकरींच्या आश्वासनानंतर आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विनंतीनंतर आ.निलेश लंकेंचे उपोषण मागे.

नगर,प्रतिनिधी.(१०. डिसेंबर.) : नगर-पाथर्डी-शेवगाव रस्ता, नगर-राहुरी-कोपरगाव रस्ता, नगर-मिरजगाव ते चापडगाव टेंभुर्णी रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके जिल्हाधिकारी कार्यालयावर चार दिवसांपासून आमरण उपोषणास बसले होते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विनंतीनंतर चौथ्या दिवशी आमदार लंके यांनी उपोषण मागे घेतले.

          सामाजिक प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी उपोषणाला बसतात मात्र हे प्रश्न सुटले पाहिजे, देशाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या प्रश्नांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून नगर जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही आमदार निलेश लंके यांना दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनंती केल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी चार दिवस सुरु असलेले आमरण उपोषण मागे घेतले.

       यावेळी आमदार संग्राम जगताप,माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनश्याम शेलार, पंचायत समिती सभापती क्षितिज घुले,उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, शिवशंकर राजळे,बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले आधी सह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

            आज राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आमदार निलेश लंके यांची यावेळी भेट घेतली.उपोषणाच्या संदर्भातली सर्व माहिती त्यांनी लंके यांच्याकडून घेतली. यावेळी अजित पवार म्हणाले की, लोकप्रतिनिधी हे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात त्याच पद्धतीने नगर जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी आमदार लंके यांनी येथे उपोषण सुरू केले या सर्व प्रश्नांच्या संदर्भात केंद्राच्या कडील हे विषय असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आता फोनवरून मी स्वतः बोलणे केले असून आमदार लंके सुद्धा त्यांच्याशी बोलले आहेत.नगर जिल्ह्यातील या तिन्ही रस्त्यांच्या संदर्भातली कामे तात्काळ मार्गी लागतील व निधी सुद्धा उपलब्ध करून देता येईल असे आश्वासन गडकरी यांनी दिले असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 2016 सालापासून या पाथर्डी रस्त्याचे काम झाले नाही, ज्या ठेकेदाराला हे काम दिले त्यांनी ते पूर्ण केले नाही. त्यानंतर दोन ठेकेदार याठिकाणी नियुक्त केले पण त्यांनी अशाच पद्धतीने कामे केले. आता देशमुख या ठेकेदाराला हे काम देण्यात आलेले आहे असे पवार यांनी सांगून त्यांचे काम मला माहित आहे असेही ते म्हणाले. या सर्व बाबीच्या संदर्भात नॅशनल हायवेचे अधिकारी व मंत्री गडकरी यांचे सुद्धा आता फोनवरून बोलणे झाले आहे.गडकरी यांनी आठ दिवसानंतर मी पुन्हा आढावा घेतो असे सांगितले आहे. मी सुद्धा या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा नजीक येथील उड्डाणपुलाचे काम 28 फेब्रुवारी पर्यंत होईल अशी ग्वाही देण्यात आलेले आहे. तर नगर पाथर्डी या महामार्गाचे काम 31 मार्च 2023 अखेरीला पूर्ण केले जाईल असे आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपामध्येआश्वासन येथील अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिले आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. मी सुद्धा नॅशनल हायवेच्या राज्यातील कामांचा सातत्याने आढावा घेतो यापुढे सुद्धा नगर जिल्ह्यातील या कामांचा आढावा घेतला जाईल व ही कामे कशा पद्धतीने मार्गी लागतील याचा सुद्धा पाठपुरावा करेल असेही ते म्हणाले.

              यावेळी बोलताना आमदार निलेश लंके यांनी चार दिवसापासून तीन रस्त्यांच्या प्रश्नासाठी माझ्याबरोबर आणि जर उपोषणाला बसले होते.मंत्री नितीन गडकरी यांनी ही कामे मार्गी लागलेली जातील असे मला आत्ता सांगितले आहे तसेच ते सुद्धा या कामाचा पाठपुरावा करून आढावा घेणार आहेत. राज्याचे विरोधी पक्ष नेते व आमचे नेते अजित पवार यांनी विनंती केल्याप्रमाणे आपण उपोषण थांबवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top