पॉस्को कायद्याअंतर्गत दाखल खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता.-ऍड. महेश तवले.
नगर, प्रतिनिधी. (०७. डिसेंबर.) : अहमदनगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन येथे माजीद खान या इसमाविरुद्ध बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याचा तपास होऊन दोषारोपपत्र अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात एकुण ७ साक्षीदार तपासण्यात आले. परंतु सदर खटल्यात आरोपी याचे विरुद्ध ठोस पुरावा नसल्यामुळे मे. कोर्टाने आरोपीस निर्दोष मुक्त केले.आरोपीचे वतीने ऍड. महेश तवले, ऍड.संजय दुशिंग, ऍड .अक्षय दांगट, ऍड.निलेश देशमुख, अहमदनगर यांनी काम पाहिले.