ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलची कु.उषा गुडीपाटी हिस जिल्हा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक.

Ahmednagar Breaking News
0

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलची कु.उषा गुडीपाटी हिस जिल्हा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक.

नगर,प्रतिनिधी.(१५. डिसेंबर.) : अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत अॅंथलॅटिक्स खेळात कु.उषा व्ही. गुडीपाटी हीने प्रथम क्रमांक पटकवित तिने सुवर्णपदक मिळविले.

वाडिया पार्क येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये ऑक्झीलियम कॉन्व्हेंट स्कूलची इ.10वीची विद्यार्थीनी कु.उषा हिने 17 वर्ष खालील वयोगटातील 400 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम 200 मीटर हा 100 मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. कु.उषा हिला प्रशिक्षक दिनेश भालेराव, शाळेचे क्रीडा शिक्षक सुहास करंडे, वर्गशिक्षिका अंजली भिंगारदिवे यांचे मार्गदर्शन मिळाले.

कु.उषा गुडीपाटी हीच्या नेत्रदिपक कामगिरीबद्दल स्कूलच्या मुख्याध्यापक जेेसिंथा पिंटो, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top