नगरकरांना पहावयास मिळणार कबड्डी स्पर्धेचा थरार.

Ahmednagar Breaking News
0

७० व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवडचाचणी कब्बडी स्पर्धेचे २७ ते ३० डिसेंबर दरम्यान वाडियापार्क मध्ये आयोजन.

प्रो लीग कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर होणार स्पर्धेचे नियोजन, नगरकरांना पाहावयास मिळणार कबड्डी स्पर्धेचा थरार.

नगर, प्रतिनिधी (१८. डिसेंबर) : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कब्बडी संघटनेच्या वतीने ७० व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत नगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे.ही स्पर्धा मॅट वर खेळवली जाणार आहे. कबड्डी प्रीमियर लीगच्या धर्तीवर प्रो कब्बड्डी प्रमाणे या स्पर्धेचे कॉर्पोरेट स्टाईलने नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे नगर- मधील खेळाडू,कबड्डीपटू, क्रीडाप्रेमीना या वर्षाच्या शेवटी एक मेजवानी मिळणार आहे.असे स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष पदमश्री पोपटराव पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

          तीन वर्षांपूर्वी ३१ वी किशोर/किशोरी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन अहमदनगर जिल्हा हौशी संघटनेच्या वतीने यशस्वीपणे केले होते त्यानंतर सलग दुसऱ्यांदा राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी राज्य संघटनेने नगरवर सोपवली आहे.ही नगरला खूप अभिमानाची बाब आहे.असे ते यावेळी म्हणाले.या स्पर्धेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा हौशी कब्बड्डी संघटनेचे आजीव अध्यक्ष दादाभाऊ कळमकर,सेक्रेटरी शशिकांत गाडे,सह सेक्रेटरी विजयसिंह मिस्कीन,उपाध्यक्ष जयंत वाघ,स्वागत समितीचे अध्यक्ष आ.निलेश लंके,आयोजन समिती सदस्य आ.संग्राम जगताप आदी उपस्थित होते.यानिमीत्ताने तयार करण्यात आलेल्या आयोजन समितीत राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,महापौर रोहिणीताई शेंडगे,राज्याचे माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात,माजी जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख,नगर दक्षिणचे खा.सुजय विखे पाटील,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे,माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे,आ.बबनराव पाचपुते,आ.श्रीमती मोनिकाताई राजळे,आ.आशुतोष काळे,आ.राम शिंदे,आ.रोहित पवार,आ.लहू कानडे,आ.डॉ.किरण लहामटे,आ.सुधीर तांबे,खजिनदार प्रकाश बोरुडे यांचा सहभाग आहे.

          दिनांक २७ ते ३० या चार दिवसात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, प्रो कबड्डी लीग चे लोकप्रिय खेळाडू सह ६०० खेळाडू, प्रत्येकी १०० कोच व्यवस्थापक आणि पंचपदाधिकारी यात सहभागी होणार असून सकाळ आणि संध्याकाळच्या दोन सत्रात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. छुट स्पोर्ट्स या लोकप्रिय टी चॅनल द्वारे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.भव्य एल ई डी वॉल सह आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा १० हजार प्रेक्षक संख्या सामावू शकेल इतक्या क्षमतेचा आकर्षक प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम आता वाडिया पार्क या ठिकाणी सुरु होणार आहे.अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने स्थापनेपासून आतापर्यंत किशोर कुमार आणि वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन अनेकदा यशस्वीपणे केले आहे.याद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन आणि नामांकित खेळाडू तसेच संघाचा खेळ पाहण्याची संधी मिळते.संघटनेने आतापर्यंत अनेक विद्यापीठ राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत.जिल्हा संघटनेचे खेळाडू पोलीस उपआयुक्त शिवछत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेते पंकज शिरसाठ यांच्याकडे तर भारतीय संघाचे माजी कर्णधारपद होते.पाकिस्तानला हरवून कबड्डीचा वर्ल्ड कप त्यांनी भारतास जिंकून दिला होता.या वर्षी आमच्या जिल्हा पुरुष संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ६९ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा जिंकली.नगर आणि राज्य संघाचा कर्णधार शंकर गदई तसेच राहुल खाटीक यांनी नुकत्याच हरियाणा आणि अहमदाबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्य संघात नगरचे प्रतिनिधित्व केले होते,आमच्या जिल्हा संघातील खेळाडू वेगवेगळ्या प्रो कबड्डी संघांत नगरचे प्रतिनिधित्व करीत आहेत.अशी माहिती अध्यक्ष निलेश लंके आणि शशिकांत गाडे यांनी दिली आहे.या स्पर्धेच्या प्रसारणा दरम्यान ४ दिवस एलइडी स्क्रीन वर प्रयोजकांच्या जाहिराती झळकणार असून मैदानावर २ फूट बाय ६०० फुटाची चौकोनी एलईडी स्क्रीनच्या पट्टीवर या जाहिराती दिसतील.प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया, लीफलेट,मैदानावर बॅनर,आउट डोअर होर्डिंग यासाठी देखील प्रायोजक उपलब्ध झाले आहेत.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशिल आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top