मोहटादेवी मंदिरात श्रीदत्त जयंती निमित्त महाप्रसादासह कीर्तनाचे आयोजन.
नगर,प्रतिनिधी.(०४. डिसेंबर.) : श्री. जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे,तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. येथील श्री क्षेत्र मोहटादेवी गड येथे दि.०७. डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सायं.६.०० वाजता होणार असून महाआरती सायं.७.००. वाजता होईल. त्यानंतर महाप्रसाद सुरु होईल असे ट्रस्ट च्या वतीने सांगण्यात आले आहे.
रात्री ९.००. वा. हभप गणेश महाराज बडे, (श्री.क्षेत्र भगवानगड.) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा.