एक गावठी कट्टा व एक जिवंत काढतुस बेकायदेशीररित्या बाळगणारा आरोपी जेरबंद.- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
नगर,प्रतिनिधी. (०२.डिसेंबर.) : करंजी बस स्टॅण्ड, ता. पाथर्डी येथे एक (01) गावठी कट्टा व एक (01) जिवंत काडतुस बेकायदशिररित्या कब्जात बाळगणारा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा इसम पाथर्डी तालुक्यातील करंजी गांवातील बस स्टॅण्ड परिसरात येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/दिनकर मुंडे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से, पोकॉ/विनोद मासाळकर, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व अर्जुन बडे अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाथर्डी तालुक्याती करंजी गांवातील बस स्टॅण्ड, येथे जावून सापळा लावुन थांबलेले असतांना थोड्याच वेळात एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसला. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीतास ताब्यात घेवुन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) शेरखान मुबारक पठाण, वय 35, रा. करंजी, ता. पाथर्डी असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक (01) गावठी बनावटीचा कट्टा व एक (01) जिवंत काडतूस असा एकूण 25,300/- रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
सदर इसम हा पाथर्डी परिसरात एक (01) गावठी कट्टा व एक (01) जिवंत काडतूस बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकॉ/विनोद शिवाजी मासाळकर ने. स्थागुशा यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. संदीप मिटके साहेब, उविपोअ श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.