वुई काप्या.... चायना मांजा....

Ahmednagar Breaking News
0

नगर शहरात चायना मांजाने खुद्द महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला आणि एका कर्मचाऱ्याला केले जखमी.

    वुई काप्या....

     चायना मांजा....

नगर प्रतिनिधी.(२२. डिसेंबर.) : अहमदनगर महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी एक बैठक घेऊन चायना मांजा  विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश दिले होते. खुद्द महापालिकेचे एक अधिकारी आणि एक कर्मचारी शहरातील नालेगाव परिसरातून जात असताना चायना मांजामुळे जखमी झाले आहेत. नगर शहरात चोरीछुपे चायना मांजाची विक्री जोरात सुरू असून यावर्षीचा पहिला झटका थेट मापालिकेचे अधिकारी शशिकांत नजान आणि एक कर्मचारी यांना बसला आहे. चायना मांजामुळे  दरवर्षी अनेक लोक जखमी होत असतात, बंदी असतानाही याची विक्री सर्रास होत आहे.

            महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे आदेश दिलेले आहेत, तरी नगरकरांना अपेक्षा आहे की याची कर्मचाऱ्यांनी कठोर अंमलबजावणी करावी.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top