टाइनी-टॉट्स नर्सरी स्कुल मधील चिमुकल्यांनी साजरा केला नाताळ.

Ahmednagar Breaking News
0

टाइनी-टॉट्स नर्सरी स्कुल मधील चिमुकल्यांनी साजरा केला नाताळ.

नगर,प्रतिनिधी.(२३. डिसेंबर.) : सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील टाइनी -टॉट्स नर्सरी स्कूलमध्ये आज नाताळ सण साजरा करण्यात आला. संचालिका सौ मीरा पाटील यांनी सर्वधर्मसमभाव म्हणजे काय ? हे शिकवत सर्व मुलांना व पालकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

           आज स्कूलमध्ये येताना विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे नव नवीन कपडे, तसेच काहींनी सांताक्लोज, जोसेफ,मेरी, गुराखी, परीचा ड्रेस परिधान करून आले होते. नर्सरी स्कूल असल्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना माहिती होण्यास मदत होईल म्हणून या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना नवनवीन सण,विविध महापुरुषांच्या जयंती,संतांच्या माहिती होईल अशी कार्यक्रम केली जातात.

      श्री. मानसिंग पाटील व सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top