नामदार नितीन गडकरी यांनी केलेली घोषणा पूर्ण केली एका नगरकराने.

Ahmednagar Breaking News
1

औरंगाबाद नागपूर फक्त ३ तासात ....

नामदार नितीन गडकरी यांनी केलेली घोषणा पूर्ण केली एका नगरकराने.

नगर,प्रतिनिधी.(२५. डिसेंबर.) : भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे नुकतेच लोकार्पण झाले. ह्या महामार्गाचे श्रेय सर्वस्वी ना.नितीन गडकरी यांनाच असून त्यांनी समृद्धी मार्गावरून हा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होईल अशी घोषणाच नामदार गडकरी यांनी केली होती व ती प्रत्यक्षात उतरवली एका नगरकराने. 

अहमदनगरचे सायकलपटू व मोटारसायकलपटू श्री शरद काळे पाटील यांनी हे साध्य करून दाखवले . शनिवार दि. २४/१२/२२  रोजी काळे पाटील यांनी औरंगाबाद ते नागपूर हे अंतर फक्त ३ तासात क्रेटा गाडीने पार केले. अहमदनगर मधून निघून ते ४.५० ला औरंगाबाद येथे पोहचले व संमृद्धी मार्गाला लागले. गाडीची डिझेल टाकी फुल्ल केली व गाडीच्या टायरची हवा चेक केली. सर्व व्यवस्तीत असल्याची खात्री झाल्यावर सिट बेल्ट लाऊन प्रवासाला सुरवात झाली. ताशी १७०-१८० ने त्यांनी गाडी चालवली व ते ७.४७ ला म्हणजेच फक्त ३ तासात नागपूर येथील झीरो पॉइंटला पोहचले. ४६५ किमी अंतर फक्त तीन तासात त्यांनी पार केले.  रस्त्यात ते कुठेच थांबले नाही. प्रवास दरम्यान त्यांच्या गाडीचा सर्वाधिक स्पीड २०१ किमी प्रती तास होता. त्या स्पीडचा स्क्रीन शॉट त्यांनी शेअर केला आहे. 

रस्ता अतिशय चांगला झाला असून ह्या मुळे वेळ व पैसा वाचणार आहे. ह्या रस्त्या वरील टोल ही अतिशय वाजवी आहे. ह्या रस्त्यावर  जितके अंतर  पार करू त्याच प्रमाणात टोल आकारला जातो. 

काळे पाटील हे उत्कृष्ट मोटार सायकलपटू देखील आहेत. अनेक विक्रम त्यांच्या नावावर नोंदविले गेले आहेत . भारताचा सुवर्ण चातुष्कोन त्यांनी मोटार सायकल वर फक्त ८८ तासात पूर्ण केल्याबद्दल त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंदविले गेले आहे. 

आज परदेशात गाडी चालवत असल्याचा अनुभव येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ह्या मिशन चे आयोजन, नियोजन व प्रयोजक अहमदनगर महानगर पालिकेचे उपायुक्त श्री यशवंत डांगे यांनी केले. विशेष म्हणजे ह्या प्रवासा दरम्यान उपायुक्त श्री यशवंत डांगे यांची त्यांना मोलाची साथ लाभली. सर्वच स्तरावरून काळे पाटील यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

1 Comments
Post a Comment
To Top