कर्जदाराने दिलेला धनादेश न वटल्याने न्यायालयाने दिली शिक्षा.
नगर, प्रतिनिधी.(२९. डिसेंबर) : श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडीट.सोसा.लि.अहमदनगर,शाखा बोधेगाव या शाखेला दिलेला ८७,४००/- रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालय क्र.१० अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए. देशमुख यांनी ९२,०००/- रूपयांचा दंड व १ महिन्याचा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.दंड न भरल्यास आरोपीस अतिरिक्त १ महिन्याचा कारावास शिक्षा सुनावली आहे.पिराजी जगन्नाथ मासळकर रा.बोधेगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर असे शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे पिराजी जगन्नाथ मासळकर यांनी श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट.सोसा. लि.शेवगाव शाखेतुन दि.०५/०३/२०२० रोजी रक्कम रू ९०,०००/- चे कर्ज व्यवसाय वाढीसाठी घेतले होते.
कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदार यांनी श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट लि.यांना रक्कम रूपये ८७,४००/- चा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोधेगाव(०१७३४) महाराष्ट्र ४१४५०३ चा धनादेश दिला होता.हा धनादेश श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसा लि.यांनी त्यांचे खाते असलेल्या बॅकेत भरला असता तो वटला नाही, त्यामुळे श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट. ऑप.क्रेडीट सोसा. लि.यांनी कर्जदार यांना वेळोवेळी लेखी व तोंडी पैसे भरण्यास सांगुन देखील कर्जदार पिराजी जगन्नाथ मासळकर यांनी पैसे भरले नाहीत.त्यामुळे श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट यांनी वकिला मार्फत कर्जदार यांना नोटीस पाठवली, परंतु कर्जदार यांनी नोटीसीला प्रतिसाद दिला नाही.म्हणुन श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसा.लि.यांनी कर्जदारा- विरूद्ध अहमदनगर येथील न्यायालयात केस दाखल केली सदर केसवर सुनावणी झाली असता श्री. विशाल गोरे यांनी पुरावे सादर केले.व फिर्यादी संस्थेतर्फे ॲड.सुरज खंडीझोड,ॲड. किरण जाधव व ॲड.कविता उदमले यांनी काम पाहीले व त्यांना ॲड.एस.आर.सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले व सुनावणी अंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए.देशमुख साहेब यांनी वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.