श्री संभाजी भिडे गुरुजी यांचे कर्जत शहरात शिवचरित्रपर व्याख्यान.
तसेच सायं काष्टी,ता श्रीगोंदा येथे तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रम.
श्री.संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनरसंस्थापना या विषयावर बोलण्यासाठी व धारकऱ्यांना संबोधण्यासाठी गुरुवार दिनांक 29/12/2022 रोजी सायंकाळी ठीक 6.00.वाजता श्री दत्त मंगल कार्यालय,काष्टी, ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर येथे श्री प्रतीक पाचपुते तालुकाध्यक्ष, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,श्रीगोंदा विभाग यांच्या नेतृत्वाखाली येणार आहेत.
दिनांक 29 जानेवारी ते 01 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या गडकोट मोहिमेच्या संदर्भातील माहिती विषयी मार्गदर्शन, आत्ताची तरुण पीढी व्यसनाधीन होऊ नये प्रत्येक तरुणाने छत्रपती श्री शिवाजी व श्री संभाजी महाराजांना आदर्श मानून आपण या देशाचे काही तरी देणे लागतो ही भावना मनात जोपासून सामाजिक कार्य करत रहावे असा तरुण तयार व्हावा म्हणून या मोहिमेचे आयोजन करण्यात येत असते.
श्री.संभाजी भिडे गुरुजी हे उस्मानाबाद येथून सकाळी 8.00 वा. निघून जामखेड, कर्जत मार्गे दुपारी 2.00 वाजता श्रीगोंदा शहरापासून सुमारे 13 कि.मी. अंतरावर असणारा यादवकालीन धर्मवीर गड, पेडगांव, ता.श्रीगोंदा येथे जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6.00 वाजता दत्त मंगल कार्यालय, काष्टी, ता.श्रीगोंदा येथे धारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर श्री प्रतिक पाचपुते, तालुकाध्यक्ष - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीगोंदा विभाग यांच्या काष्टी येथील निवासस्थानी श्री संभाजी भिडे गुरुजी हे मुक्कामी राहणार आहेत.