पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केली मोर्चाच्या मार्गाची पाहणी.
नगर, प्रतिनिधी. (१३. डिसेंबर.) : नगर शहरामध्ये लवजीहाद विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या मार्गाची पाहणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केली. मोर्चाच्या मार्गावर मोठा पोलिसांचा फौजफाटा मोर्चादरम्यान तैनात असणार आहे. या मोर्चासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक ,दोन पोलीस उपअधीक्षक, अकरा पोलीस निरीक्षक ,43 सहाय्यक पोलीस निरीक्षक पीएसआय ,380 पुरुष महिला पोलीस अंमलदार ,दोन आरसीबी प्लॅटून आणि पाच स्ट्रायकिंग फोर्स असणार आहे.
पोलिसांच्या गुप्तचर विभागाने मोर्चात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आढावा घेतला आहे.तसेच या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणि व्हिडिओ शूटिंग कॅमेरे तैनात राहणार असून पोलीस प्रशासनही या मोर्चासाठी सज्ज झाले आहे.