ब्रम्हाकुमारीज विद्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान,सत्कार व ध्यानधारणा सत्र कार्यक्रम संपन्न.

Ahmednagar Breaking News
0

ब्रह्माकुमारीज विद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान,सत्कार व ध्यानधारणा सत्र कार्यक्रम संपन्न.

नगर,प्रतिनिधी.(25.डिसेंबर.) :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार व ध्यानधारणा सत्र रविवार दि. 25.डिसेंबर रोजी ब्रह्माकुमारीज विद्यालय,शिवदर्शन भवन,सावेडी,अहमदनगर येथे सकाळच्या सत्रात कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी जिल्हा बँकेचे डायरेक्टर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर डी मंत्री, म्हणाले 1985 सालापासून ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संपर्कात असून माउंट आबू राजस्थान येथे विद्यालयाच्या मुख्यालयात ते जाऊन आलेत आपल्या अनुभवी वक्तव्यात ते पुढे म्हणाले सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ज्येष्ठांना खरी सुख शांती मिळत नाही ते मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी हे ईश्वरीय विश्व विद्यालय आणि इथे शिकविला जाणारा राजयोग ध्यानधारणा हे खऱ्या अर्थाने जीवनात सुख शांती प्राप्त करून देतो.

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका लता मुथा यांनी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संपर्कात आल्यानंतरचा जीवनात आलेला परिवर्तन सर्वांना सांगितला पुढे त्या म्हणाल्या जीवनात चांगल्या गोष्टी करण्यासाठी ध्यान धारणेचा खूप चांगला उपयोग होतो आणि जीवन सुख शांतीमय बनते.

स्नेहालयाचे संचालक सुवालालजी शिंगवी यांनी ईश्वरीय जीवनातला अनुभव आणि इथे शिकविला जाणाऱ्या राजयोग ध्यानधारनेचा जीवनात आलेला परिवर्तन सर्वांना सांगितले.

ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मुख्य इंचर्ज बी के राजेश्वरी दिदी आपल्या वक्तव्यात म्हणाल्या जेष्ठांनी आपल्या जीवनातील सर्व कर्तव्यांना पार पाडून निवृत्तीकडे वळल्यावर आता स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी प्रयत्न करायला हवे परमात्म्याशी नातं जोडून आपलं एकटेपणा घालून राहिलेला वेळ आनंदात सुख समाधानात श्रेष्ठ बनविण्यात सफल करायला हवे.

कर्जत सेवाकेंद्राच्या इंचार्ज बी के सीमा दीदी म्हणाल्या प्रत्येक घरात जेष्ठ व्यक्ती असणं हा त्या घराचा मूळ आधार आहे आपल्या जीवनाच्या अनुभवाने घरातील लहान थोरांना मार्गदर्शन करत राहणे हे खूप महत्त्वाचे आहे ज्याद्वारे सुसंस्कृत पिढी तयार होण्यास मदत होते तसेच यथार्थ जीवनाची सार्थकता जीवनात अध्यात्मिकतेची काय आवश्यकता आहे यावर मार्गदर्शन केले विद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या राजयोग ध्यान धारणेचा काय अर्थ हे सर्वांना स्पष्ट करून सांगितले.

वरिष्ठ राजयोग शिक्षिका बी के निर्मला दीदी यांनी आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देत राजयोग ध्यान धारणा सत्र घेतले.

श्रीगोंदा सेवाकेंद्र इंचार्ज बी के सुप्रभा दीदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कुमारी मनस्वी कोरडे हिने आपल्या नृत्यने सर्वांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमात ईश्वरीय परिवाराच्या उपस्थितीत जवळपास 180 जेष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार करण्यात आले.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top