तोफखाना पोलिसांकडून तरुणीस वेश्याव्यवसायामध्ये अडकविणारा फरार आरोपी जेरबंद.

Ahmednagar Breaking News
0

तोफखाना पोलिसांकडून तरुणीस वेश्याव्यवसायामध्ये अडकविणारा फरार आरोपी जेरबंद.

अहमदनगर,प्रतिनिधी.(१२.डिसेंबर.) : तरुणीस वेश्याव्यवसायामध्ये अडकविणारा फरार असलेला आरोपी तीन वर्षानंतर जेरबंद तोफखाना पोलीसांची कामगिरी,तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुरनं ५९५/२०१९ भा.दं.वि.कलम ३७० (३),३२३,३२४, ५०४,५०६ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५, ६, ७ प्रमाणे गुन्हा दि.१०/०४/२०१९ रोजी दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्ह्यातील फिर्यादी हिस आरोपींनी जास्त पगारावर घरगुती काम मिळवून देतो असे सांगुन मुंबई येथुन बोल्हेगाव ता.जि.अहमदनगर येथे घेवून येवून तीस वेश्याव्यवसाय करण्यास सांगीतले.त्यावर फिर्यादी हीने नकार दिल्याने तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.त्यानंतर फिर्यादी हि तेथून पळुन येवून तोफखाना पोलीस स्टेशन येथे आली व तिने दिलेल्या फिर्यादनुसार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाले नंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी पल्लवी ऊर्फ शारदा राजेंद्र मांगडे (रा.बोल्हेगाव ता.जि.अहमदनगर) हिस अटक करण्यात आली होती,परंतु गुन्ह्यातील आरोपी नामे गिरीष रविंद्र थोरात हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार होता.त्याला दि. १२/१२/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक श्री.ज्योती गडकरी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आरोपी थोरात हा वेगवेगळे वेशांतर करुन त्याचे वास्तव्याचे ठिकाणे वारंवार बदलत आहे, परंतु आज रोजी तो पत्रकार चौक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानुसार मिळालेल्या बातमीच्या आधारे पत्रकार चौक येथे सापळा लावुन आरोपी नामे गिरीष रविंद्र थोरात,वय ३४,रा.उभ्या मारुती मंदिराजवळ, बोल्हेगाव,ता.जि.अहमदनगर यास ताब्यात घेवून वरील नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक,श्री.राकेश ओला अपर पोलीस अधिक्षक,श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अनिल कातकडे यांचे सुचना व मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक श्री.ज्योती गडकरी तोफखाना पोलीस स्टेशन व गुन्हे शोध पथकामधील पोउपनिरी समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/ सुनिल शिरसाठ,पोना/संदिप धामणे,अविनाश वाघचौरे,अहमद इनामदार,वसिम शेख, सुरज वाबळे,सतिष त्रिभुवन यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top