श्री.दत्त जयंती निमित्त केडगाव नगरीतील श्रीमंत सद्गुरु शंकरशेठ महाराज मठात विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Ahmednagar Breaking News
0

श्री.दत्त जयंती निमित्त केडगाव नगरीतील श्रीमंत सद्गुरु शंकरशेठ महाराज मठात विविध कार्यक्रमाचे आयोजन.



नगर,प्रतिनिधी. (दि.४.डिसेंबर) : अहमदनगर शहरातील केडगाव नगरीतील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज यांच्या मठात 07 डिसेंबर रोजी श्री.दत्त महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे.या कार्यक्रमाची रूपरेषा श्री.दत्त महाराजांचा अभिषेक .सकाळी 7 ते 8 वा,महादत्तयाग यज्ञ सोहळा, पूर्णहोती,आरती. सकाळी 8 ते 11 वा,दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाम यज्ञ सोहळा. सकाळी 11 ते 12 वा,श्री दत्त महाराजांची भिक्षा. दुपारी 12 वा,महाआरती 12.30 ते 1 वा, जय शंकर भजनी सेवा मंडळ यांची भजन संध्या, सारोळा कासार. दुपारी 1 ते 3 वा, श्रींचा पालखी सोहळा. दुपारी 3 ते 5 वा,हभप श्री. सिद्धनाथ राऊत महाराजांचे दत्त महाराज जन्मोत्सावर कीर्तन. सायंकाळी 4 ते 6 वा, श्री दत्त महाराजांचा जन्म सोहळा.सायंकाळी 6 वा, श्रींचा भव्यदिव्य महापालखी सोहळा,आतिषबाजी, पुष्पवृष्टी. सायंकाळी 6 ते 7 वा,सनी वाघेला यांची भजन संध्या .सायंकाळी 7 ते 10 वा.अशी असेल अशी माहिती अशोक दादा जाधव यांनी दिली आहे.

            


           तसेच भाविकांसाठी दुपारी 1 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद आयोजित केलेला आहे. तरी श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ. शिवाजीनगर ,केडगाव व समस्त सेवेकरी वृंद यांचकडून जास्तीत जास्त भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top