आर्ट ऑफ लिव्हिंगचे मोफत योगाभ्यास आयोजन
अहमदनगर,प्रतिनिधी.(१०.डिसेंबर.) : शारिरीक व मानसिक स्तरावर आपले शरीर सूक्ष्म प्राणशक्तींशी जोडलेले आहे. त्यासाठी योगा आणि ध्यानचा सराव नियमीत केल्याने मानसिक शांती व आरोग्य चांगले राहते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगा आणि ध्यान याची प्रत्येकाला खूप गरज आहे त्यामुळे जिल्ह्याचे केंद्र सावेडी येथील आर्ट ऑफ लिव्हिंग,गावडे मळा, ज्ञान केंद्रामध्ये दर रविवारी संध्यां. ६ से ८ मोफत योगा ध्यान शिबीर आहे. शिबीरासाठी नांव नोंदणीसाठी संपर्क ८९९९९४९०६९ यांचेकडे करावे.असे आवाहन नगर शाखेकडून करण्यात आले आहे. तरी याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा.