नगर - मनमाड रोडवरून जाणाऱ्या कारमध्ये पोलिसांनी जप्त केला गांजा.

Ahmednagar Breaking News
0

नगर - मनमाड रोडवरून जाणाऱ्या कारमध्ये पोलिसांनी जप्त केला गांजा. 


नगर,प्रतिनिधी. (26. डिसेंबर.) : हुंदाई कारमधुन गांजाची वाहतुक करणारे तीन आरोपीविरुध्द कारवाई करुन 13,60,000/- (तेरालाख साठ हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.- स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व तोफखाना पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ/रोहित येमुल, सागर ससाणे, आकाश काळे, रविंद्र घुंगासे व चापोहेकॉ/बबन बेरड अशांना पेट्रोलिंग फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथक तात्काळ रवाना केले. 

पथक अवैध धंद्याची माहिती घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नगर-मनमाड जाणारे रोडवर, मनमाडकडुन अहमदनगरकडे एक ग्रे रंगाची आय-20 कार येत असुन त्यामध्ये गांजा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि/कटके यांनी नमुद माहिती पथकास कळवुन तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना सदर बातमी कळवुन पंच व आवश्यक साधने सोबत घेवुन कारवाईस सोबत येणे बाबत कळविले.  

पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार व पंच यांना सोबत घेवुन नगर मनमाड रोडने पेट्रोलिंग फिरुन सदर वाहनाचा शोध घेत असतांना राजपाल होलसेल साडी सेंटरचे जवळ एक हुंदाई कंपनीची एमएच/12/टीएन/6045 नंबर असलेली ग्रे रंगाची आय-20 कारची मागिल काच फुटलेली व पुढील काच अर्धवट फुटलेल्या अवस्थेत उभी असलेली व त्यामध्ये तीन इसम बसलेले दिसले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच कारमधील संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मुकेश अरुण नेटके वय 34, रा. पाटील इस्टेट गल्ली नं.2, शिवाजी नगर, जिल्हा पुणे, 2) जावेद इनायत शेख वय 21, शिवाजीनगर स्टेशन रोड, शांतीनगर, जिल्हा पुणे व 3) अजय अरुण जोजंट वय 26, पाटील इस्टेट गल्ली नं. 10, शिवाजी नगर, जिल्हा पुणे असे सांगितले. नमुद संशयीतांचे ताब्यातील कारची पंचा समक्ष झडती घेता कारचे डिकीत दोन ताडपत्रीचे पांढरट पिशवीचे आत निळे प्लॅस्टीकचे पिशवीत भरलेला व उग्र वास येत असलेला गांजा मिळुन आला त्याबाबत त्यांचेकडे विचारपुस करता सुरुवातीस ते समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागले त्यांना अधिका विश्वासात घेवुन सखोल व बारकानईने चौकशी करता त्यांनी सदर गांजा आमचा असुन विक्री करीता घेवुन जात असले बाबत माहिती दिल्याने त्यांना 5,60,000/- रु. किंमतीचा 28 किलो गांजा व 8,00,000/- रुपये किंमतीची हुंदाई कंपनीची आय-20 कार असा एकुण 13,60,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन तीनही आरोपी विरुध्द सफौ/राजेंद्र देवमन वाघ, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन तोफखाना  पोलीस स्टेशन गु.र.नं. 1183/2022  एनडीपीएस कायदा कलम 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.

आरोपी नामे अजय अरुण जोजंट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यात एनडीपीएस ऍ़क्ट, मोटार वाहन कायदा व दंगा करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण-05 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -

अ.क्र. पोलीस स्टेशन कलम

1. खडकी जिल्हा पुणे गु.र.नं. 3201/2011 एनडीपीएस ऍ़क्ट क. 20 (ब)

2. खडकी जिल्हा पुणे गु.र.नं. 3132/2014 भादविक 160

3. निगडी जिल्हा पुणे गु.र.नं. 937/2019 एनडीपीएस ऍ़क्ट क. 20 (ब) व 8 (क)

4. फरासखाना जिल्हा पुणे गु.र.नं. 3286/2013 मोटार वाहन कायदा कलम 184, 185

5. तोफखाना गु.र.नं. 1183/2022 एनडीपीएस ऍ़क्ट क. 20 (ब)

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top