लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायद्यासाठी महिला रस्त्यावर.

Ahmednagar Breaking News
0

लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा लागू व्हावा यासाठी नगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा, महिलांची उपस्थिती लक्षणीय.

नगर,प्रतिनिधी.(१४.डिसेंबर) : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने लव्ह जिहाद कायदा करण्याच्या मागणीसाठी नगर शहरांमध्ये बुधवारी १४ डिसेंबर रोजी काढलेल्या मोर्चास मोठी गर्दी झाली.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे माळीवाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाची सुरूवात झाली. हिंदुत्त्वादी नेते कालीचरण व काजल दीदी हिंदुस्तानी या मोर्चात सहभागी झाले होते.जुन्या बसस्थानकजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा माळीवाडा, आशा टॉकीज चौक,माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रस्त्यामार्गे दिल्लीगेट जवळ आला व दिल्लीगेट जवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.या मोर्चाला कालीचरण महाराज व काजल दीदी हिंदुस्तानी यांनी संबोधित केले.या मोर्चाला विविध हिंदुत्वादी संघटनेने पाठिंबा दर्शवून प्रत्यक्ष सहभागी झाले. यावेळी मोर्चाला खूप गर्दी असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top