श्री.विशाल गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीमुळे भाविकांची गर्दी.
नगर,प्रतिनिधी.(११.डिसेंबर.) : आज श्री विशाल गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही भाविक चतुर्थी असल्याने गणपती अभिषेक करत होते. तर काही भाविक आज उपवास असल्यामुळे मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटत होते.भाविकांसाठी आज चंद्रोदय रात्री ०८.४०. वाजता आहे, असे श्री विशाल गणपती,माळीवाडा देवस्थान, ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.