रेशनिंगचा शासकीय तांदूळ ६ लाख ७३ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त.- स्थानिक गुन्हे शाखा.

Ahmednagar Breaking News
0

रेशनिंगचा शासकीय तांदूळ ६ लाख ७३ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त.- स्थानिक गुन्हे शाखा.

नगर,प्रतिनिधी.(६.डिसेंबर) : नगर औरंगाबाद पांढरीपुल मार्गे शेवगांवकडे जाणारे रोडवरुन खोसपुरी गावाच्या शिवारात रेशनिंगचा शासकीय तांदूळाचा ट्रक रु 6,73,250 (सहा लाख 73 हजार 250 रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.कार्यालयात हजर असतांना पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की,पांढरी पुल ते शेवगांव जाणारे रोडने शेवगांवकडून पांढरीपुलाकडे अशोक लेलंड ट्रक क्रमांक एम.एच. 17 बी वाय 5960 यामधुन रेशनिंगचा तांदुळ काळाबाजारात विक्रीसाठी जात आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाली आहे.तरी तुम्ही सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कार्यवाही करावी असा आदेश दिल्याने सपोनि/दिनकर मुंडे,पोहेकॉ 575 विजयकुमार बाळासाहेब बेठेकर,पोहेकॉ 486 बापूसाहेब रावसाहेब फोलाणे,पोना 376 शंकर संपत चौधरी,पोना 1772 लक्ष्मण चिधू खोकले,पोना 1487 सचिन दत्तात्रेय अडबल,पोना/1372 संतोष शंकर लोढे, पोकों,2649 जालिंदर मुरलीधर माने, चालक पोहेकॉ चंद्रकांत कुसळकर असे वरील नमुद पोलीस स्टाफ स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय येथून शासकिय वाहन क्रमाम एम.एच. 16 एन 590 मधून 23.30 वा. निघून नगर औरंगाबाद  रोडने पांढरीपुल मार्गे शेवगांवकडे जाणारे रोडवरुन खोसपुरी गावचे शिवारात ट्रक येताना दिसताच आम्ही आमचे वाहन थांबवून दि. 04/12/2022 रोजी 00.15 वा. सदर ट्रकला धावण्याचा इशारा करताच ट्रकला ट्रकचे बीनमध्ये ट्रक चालक व एक इसम बसलेले दिसले. त्यांचे नांव पत्ते विचारता चालकाने त्याचे नांव (1) फारक फकीर मंहमद शेख वय 30 वर्षे रा. खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर व बाजूस बसलेल्या इसमाने त्याचे नांव (2) कांतीलाल झुंबरलाल भंडारी वय 54 वर्षे रा. खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांना गाडीत काय गाल आहे याबाबत विचारले असता त्यांनी तांदळाच्या 210 गोण्या असल्याचे सांगितले. ट्रकच्या मागील बाजूस जाऊन खात्री केली असता ट्रकमध्ये पांढ-या गोण्यामध्ये तांदुळ असल्याचे यानी केली.सदर तांदुळाचे बाबत विचारपुस करता है उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. कांतीलाल भंडारी यांना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी कळविले की ट्रकचा मालक असून ट्रकमध्ये असलेल्या तांदळाच्या गोण्या मुकेश बोरा रा.बदले वली ता. शेवगाव यांचे दुकानातून भरलेला असून तो रेशनचा शासकिय स्वस्त धान्य वितरण योजनेतील तांदुळ असल्याचे सांगून दुस- या गोण्यांमध्ये भरुण विक्रीसाठी घेऊन चाललो आहे.असे सांगितले.त्यांचेकडे सदर तांदळाचे कोणत्याही प्रकारचे बीले आढळुन आले नाही. सदर तांदळाचे व ट्रकचे वर्णन खालील प्रमाणे 1)1.73,250/- रु. कि.चा 210 पांढ-या रंगाच्या गोण्या त्यामध्ये प्रत्येकी 50 कि. शासकिय स्वस्त वितरण योजनेतील तांदुळ प्रति किलो 16.50/- रु. प्रमाणे एकुण वजन 10500 किलो बुबा किं.अं. 2) 5,00,000/- रु. एक. अशोक लेलंड कंपनीचा मरन रंगाचा ट्रक क्रमांक एम. एच. 17 बी वाय 5960 जु. वा कि.नं.6,73,250/-येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीचा ट्रक व शासकिय स्वस्त धान्य वितरण योजनातील तांदुळ मिळुन आल्याने सपोनि/दिनकर मुंडे यांनी जागीच पंचनामा करून ताब्यात घेतला.तसेच ट्रक चालक व मालक यांनाही ताब्यात घेतले आहे.04/12/2022 रोजी 00.15 वा.चे सुमा, पांढरीपुल मार्गे शेवगांवकडे जाणारे रोडवरून सोमपुरी गावचे शिवारात रोडवर इसम नामे ट्रक चालक (1) फरक फकीर महमद शेख वय 30 वर्षे रा. खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर व ट्रक मालक (2) कांतीलाल झुंबरलाल भंडारी वय 54 वर्षे रा. खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर यांनी (3) मुकेश बोरा रा. बदले वाली ता. शेवगांव यांचे दुकानातून 1,73,250/- रु. कि. चा 210 पांढ-या रंगाच्या गोण्या त्यामध्ये प्रत्येकी 50 कि. वजनाच शासकिय स्वस्त धान्य वितरण योजनेतील तांदुळ दुस-या गोण्यांमध्ये भरण विनापरवाना बेकायदेशिररित्या जवळ बाळगून त्याची वाहतूक करून काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असतांना मिळुन आले त्यांचेविरुध्द जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 भादवि कलम 34 प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे. पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांना सदर घटनेची माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top