चार तासात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केले जेरबंद.

Ahmednagar Breaking News
0

चार तासात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केले जेरबंद.

नगर,प्रतिनिधी.(29.डिसेंबर) : औरंगाबाद येथे खुन करुन फरार झालेला आरोपीस श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चार तासात पकडले.दि.29.12.2022 रोजी प्रभारी अधिकारी सपोनि.ज्ञानेश्वर थोरात श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे,यांना पोनि/सचिन इंगोले,वांळुज पोलीस ठाणे औरंगाबाद शहर यांनी कळविले की,वाळुज पोलीस ठाणे गुन्हर रजि.नंबर 401/2022 भा.द.वि.क. 302 वगैरे गुन्हयातील आरोपी नामे,सचिन शामराव नाटकर (रा.भोकर,ता.श्रीरामपुर जि. अहमदनगर) याने 12 वर्षापुर्वी त्याच्या बहिनीला पळवून नेण्याचे कारणावरुन इसम नामे.बाबासाहेब छबुराव खिलारे (रा.भोकर ता. श्रीरामपुर,जि.अहमदनगर) याचा आज दि.29. 12.2022 रोजी सांय.05.00 वा चे सुमारास खुन केला आहे.

आरोपी सचिन शामराव नाटकर याचा शोध घेण्यास कळविले असता,सदर आरोपी बाबत गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,आरोपी नामे सचिन शामराव नाटकर हा त्याची मोटार सायकलने नेवासाकडुन भोकर ता.श्रीरामपुर येथे जात आहे.यावरुन आरोपीचा भोकर ते खोकर फाटा परिसरात शोध घेत असताना सदरचा आरोपी श्रीरामपुर कडे जाणारे रोडजवळ दिसला तेव्हा सदर आरोपीस पोलिसांची चाहुल लागताच तो शेजारचे ऊसाचे शेतात पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोठया शिताफीने 7.15 वा सुमा ताब्यात घेवुन श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे आणले आहे.सदर अरोपीचे नाव व पत्ता विचारले असता त्याचे नाव सचिन शामराव नाटकर वय 24 वर्षे धंदा मजुरी,रा भोकर ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले असुन त्यास हिरो स्प्लेंडर मोटार सायकल नंबर MH.15 AN.6285 आरोपी व वाहनासह पोनि.श्री सचिन इंगोले व पथक वाळुज पोलीस स्टेशन जि.औरंगाबाद यांचे गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगीरी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि मा.श्री.संदिप मिटके उपविभागिय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे श्री.ज्ञानेश्वर थोरात,सहा.पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक संजय निकम व अतुल बोरसे, सफो/हबीब अली,पोना/ अनिल शेंगाळे,पोना/प्रशांत रणनवरे,पोकॉ/संदिप पवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top