आयुष मंत्रालयाच्या भव्य हॉस्पिटलचे लवकरच लोकार्पण.-भैय्या गंधे यांची माहिती.
मोफत निसर्गोपचार व आयुर्वेद शिबीर सप्ताहाचे उद्घाटन.
भैय्या गंधे म्हणाले, सध्याच्या महागाईच्या काळात वैद्यकीय उपचार खूप महाग झाल्याने सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आधार ठरणारे केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या नगरमधील भव्य हॉस्पिटलचे लवकरच लोकार्पण होणार आहे. माजी खासदार स्व.दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून तारकपूर येथे हे अद्यावत व भव्य हॉस्पिटल पूर्णत्वास येते आहे. या हॉस्पिटल मधून १०० टक्के आजार बरे करणारे दर्जेदार उपचार अत्यंत कमी खर्चात मिळणार आहेत. देशाचे पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी आयुष्यभर निस्वार्थ देशसेवा केली. त्यांच्या विचारावर काम करत शहर भाजप समाजसेवा करत आहे. स्व.वाजपेयींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या शिबिरात डॉ.हेमांगिनी पोतनीस व डॉ.पद्माकर रासवे हे मोफत दर्जेदार आयुर्वेद व निसर्गोपचार करणार आहेत. शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
यावेळी निसर्गोपचार तज्ञ डॉ.हेमांगिनी पोतनीस यांनी निसर्गोपचाराचे महत्व सांगितले. प्रास्ताविकात शिबीर संयोजक डॉ.पद्माकर रासवे यांनी शिबिराची माहिती दिली. यावेलिऊ डॉ.शुभम रासवे, भाजपच्या वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ.विलास मढीकर, शहर उपाध्यक्ष संतोष गांधी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर रासकर, बाळासाहेब भुजबळ, राजू मंगलारप, महावीर कांकरिया, अनिल सबलोक, लक्ष्मिकांत तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.