पाथर्डी तालुक्यातील बेकायदेशीर गांजाच्या शेतावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा.
अहमदनगर,प्रतिनिधी.(6.डिसेंबर) : पाथर्डी तालुक्यातील मुंगूसवाडे शिवारामध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले बेकायदेशिर गांजाचे शेतावर छापा टाकुन 36,000/- (छत्तीस हजार) रु.किंमतीची 55 लहान मोठी गांजाची झाडे जप्त केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे,सफौ/मनोहर शेजवळ,विष्णु घोडेचोर,पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे,दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,सुरेश माळी,विशाल दळवी,पोकॉ/विनोद मासाळकर,मपोना/भाग्यश्री भिटे,चापोहेकॉ/उमाकांत गावडे व भरत बुधवंत अशांना बोलावुन घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याबाबत माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.स्थागुशा पथक पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती घेत असतांना पोनि/श्री.अनिल कटके स्थागुशा अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मुंगूसवाडे शिवारातील हॉटेल ओमकारचे बाजुस,ता.पाथर्डी येथे महादेव खेडकर हा त्याचे मालकीचे शेतात घराचे मागे गांजा वनस्पीतीची झाडे लावलेली आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पाथर्डी पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन सदर प्राप्त माहितीची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.नमुद सुचना प्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना बातमीतील हकिगत सांगुन पंचाना सोबत घेवुन कारवाईस सोबत येणेबाबत कळविले.पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोनि/श्री.सुहास चव्हाण, सपोनि कायंदे, सपोनि/वाघ व पोलीस स्टाफ कारवाई करीता आवश्यक साधने सोबत घेवुन स्थागुशा पथक बातमीतील मुंगूसवाडे शिवारातील हॉटेल ओमकारचे अलिकडे वाहने लावुन,पायी चालत गेली व हॉटेलचे बाजुस असलेल्या शेतातील घराचे पाठीमागे तेथे हजर असलेल्या इसमास त्याचे नाव,पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव महादेव दादाबा खेडकर, वय 55,रा.मुंगूसवाडे,ता. पाथर्डी असे असल्याचे सांगितले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे मालकीचे शेत जमिनी विषयी चौकशी केली असता त्याने त्याचे घर हे त्याचे मालकीचे शेत गट क्र.756 मध्ये असुन घराचे मागील बाजुस असलेली शेती स्वत:चे मालकीची आहे असे सांगितले. दोन शासकिय पंचासह मिळालेल्या माहितीची खात्री करुन छापा घालुन आरोपी नामे महादेव दादाबा खेडकर, वय 55,रा.मुंगूसवाडे, ता.पाथर्डी याचे कब्जातील शेतामधुन 36,000/- हजार रु. किंमतीची 4 किलो 500 ग्रॅम वजनाची लहान मोठी 55 हिरवी झाडे मिळुन आल्याने कारवाई करुन जप्त केली आहे.सदर घटने बाबत पोहेकॉ/872 सुरेश चंद्रकांत माळी ने.स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1164/2022 एन.डी.पी.एस. कलम 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कायदेशिर कारवाई पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.