आर्ट ऑफ लिव्हिंगचे नववर्षानिमित्त रक्तदान शिबिर.
नगर, प्रतिनिधी.(29. डिसेंबर.) : आर्ट ऑफ लिव्हिंग, ज्ञान क्षेत्र,गावडे मळा,पाईपलाईन रोड, अहमदनगर येथे नवीन वर्षाचे औचित्य साधून 1 जानेवारी 2023 ला सकाळी 8.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रक्तदान ही जनसामान्यांची सेवा - यालाच माणूया ईश्वर सेवा असे धोरण आपल्या डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येकाने रक्तदान करावे असे अहमदनगर शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात रक्तदान करावे आणि यातून गरजू नागरिकांना मदत होईल याचा विचार करावा.