राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात कारवाई करून 11 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.
नगर,प्रतिनिधी.(१८. डिसेंबर.) : अहमदनगर जिल्हयात ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. ग्रामपंचायत निवडणूका भयमुक्त वातावरणात होण्याकरीता जिल्हयातील सर्व तालुक्यातील अवैध मद्यावर प्रभावीपणे कारवाया करण्यांबाबत सर्व क्षेत्रीय विभागाना तसेच भरारी पथकांना सूचीत करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने दिनांक १५.१२.२०२२ ते दि. १७.१२.२०२२ या कालावधीत जिल्हयातील अवैध मद्यविक्री, निर्मिती तसेच वाहतुक, व हातभटटी दारु, अवैध ताडी विक्री निर्मिती, अवैध मद्यविक्री करणारे हॉटेल्स, ढाबे, इ. वर कारवाई करण्यांबाबत विभागाने गुन्हे अन्वेषणाचे कामकाज केले आहे. तसेच सदर कालावधीत विशेष मोहिमा राबविण्यांत आलेल्या असून प्रभावी कारवाई करीता विशेष पथके तयार करण्यांत आलेली होती.
ग्रामपंचायत निवडणूकीचे अनुषंगाने दिनांक १५.१२.२०२२ ते दि.१७.१२.२०२२ या कालावधीत जिल्हयात या विभागाने अवैध मद्यावर केलेल्या कारवाईची माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण ४२ गुन्हे नोंद करुन ४२ आरोपीना अटक करण्यांत आलेली आहे.त्यात देशीदारु :- २५०.०२ ब.लि. विदेशीदारु:- १०१.२८ ब.लि. रसायन :- ४०० लि.हातभटटी दारु : २२९ लि. ताडी :- २०५ लि. जप्त वाहने संख्या : ७ (१ चारचाकी वाहन, ६ दुचाकी वाहने ) असा एकूण रुपये ११,६८,२७४ /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यांत आलेला आहे.