नगरच्या श्री श्री रविशंकर शाळेतील विद्यार्थ्यांची निसर्गरम्य रोपवाटीकेमध्ये सदिच्छा भेट.
नगर प्रतिनिधी. (०४. डिसेंबर.) : शाळेतील विद्यार्थ्यांनीऔटी यांच्या निसर्गरम्य रोपवाटीका मध्ये भेट देऊन विविध फुलांची, रोपांची आणि फळझाडांची कुतुहत्याने माहिती घेतली.निरनिराळ्या रंगाची फुले बघुन मुलांनी मनमुराद आनंद लुटला.आजकालच्या या युगात मुलांना झाडांचे महत्त्व पटवून देण्याचा हा आगळा वेगळा उपक्रम शाळेच्या व्यवस्थापकांनी आयोजित केला होता. रोपवाटीका मध्ये मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात श्लोक पठणाचा व खाऊ खाण्याचा सुद्धा आनंद लुटला.भेटीतून मुलांना निसर्ग बद्दल गोडी निर्माण व्हावी आणि रोजच्या अभ्यासाच्या दिनचर्य तुन का बदल वाटावा म्हणून या भेटीचे आयोजन शाळेच्या व्यवस्थापकांनी केले होते.
श्री. श्री.रविशंकर विदया मंदिर या आध्यात्मिक व आधुनिक शाळेच्या संकल्पनेमधुन मुलांना विविध माहिती देणे हा हेतु बाळगुन शाळेमध्ये योगदिवस,गणपती उत्सव,सहनी एकादशी सोहळा निमित्त दिंडीचे आयोजन, दसऱ्या निमित्त सरस्वती पुजन,नवरात्री उत्सव, स्वातंत्र्यदिन, दहीहंडी उत्सव,गुरुपौर्णिमा उत्सव, फॅन्सी ड्रेस स्पर्धा,संस्कृत श्लोक पठण स्पर्धा अशा विविध सणांचे व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.यामुळे मुलांच्या बौद्धिक, शारीरीक व सामाजिक कलांना वाव मिळावा व मुलांचा सर्वागीण विकास व्हावा असा मानस शाळेच्या व्यवस्थापकांनी केला आहे.