महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अखेर मुहूर्त ठरला.
नगर,प्रतिनिधी. (०८. डिसेंबर.) : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहमदनगरला होणार असून या स्पर्धेचा अखेर मुहूर्त ठरला. येत्या 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ही कुस्ती स्पर्धा होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली.याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली. लवकरच ही स्पर्धा अहमदनगर शहरातील वाडियापार्क येथे होणार आहे.