डॉ.पराग संचेती आणि डॉ.अजय कोठारी यांचे हाडांचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती यावर मार्गदर्शन.

Ahmednagar Breaking News
0

डॉ.पराग संचेती आणि डॉ.अजय कोठारी यांचे हाडांचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती यावर मार्गदर्शन.


नगर,प्रतिनिधी.(०५. डिसेंबर.) : संचेती इन्स्टिटयूट फॉर ऑर्थोपेडिकस अँड रिहॅबिलिटेशन पुणे आणि जैन सोशल फेडरेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपल्या दैनंदिन जीवनात काही सहज सोपे बदल आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या हाडांची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या बद्दल मार्गर्शन करण्यासाठी मागील ५६ वर्षांपासून अत्यंत जटिल अशा हाडांच्या शस्त्रक्रिया करून हजारो अतिगंभीर रुग्णांचे जीवन सुसह्य करणारे पुणे येथील संचेती हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉ.पराग संचेती आणि मणकेविकार तज्ज्ञ डॉ. अजय कोठारी हे अहमदनगर येथे येणार आहेत .

                            


  डॉ.पराग संचेती हे गुडघेदुखी निदान व उपचार आणि डॉ.अजय कोठारी हे पाठदुखीला द्या पूर्णविराम या विषयांवर मार्गदर्शन करून सध्या हाडांच्या आजारांवरील आधुनिक उपचार पद्धती या विषयी ते मार्गदर्शन करणार आहेत . सदर व्याख्यान हे आनंद धाम,धार्मिक परीक्षा बोर्ड,अहमदनगर या ठिकाणी दि ०९ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५.३० ते ०७ या वेळेत आयोजित केलेले आहे . या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जैन सोशल फेडरेशन अहमदनगर आणि संचेती हॉस्पिटल पुणे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top