विठ्ठल बुलबुले यांचा सपत्नीक मानपत्र देऊन सन्मान.
नगर,प्रतिनिधी.(०२. डिसेंबर.) : प्रतिज्ञा विषयावर 1001 व्याख्याने पूर्ण केल्या बद्दल जिल्हा मुख्याध्यापक संघ व फिरोदिया प्रशालाने शिक्षणाधिकारी मा. अशोक कडूस, प्रा. सुभाष वारे, छायाताई फिरोदिया, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडितसर, मुख्याध्यापक उल्हास दुगडसर यांच्या हस्ते विठ्ठल बुलबुले यांचा मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.
सुरुवातीला विठ्ठल बुलबुले यांनी अडीच हजार विद्यार्थ्यांना भारत माझा देश आहे या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यान दिले.यावेळी पुणे,मुंबईसह अहमदनगरमधील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, अभियंते, व्यावसायिक, नाट्य क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.