चि.अर्णव चेतन शिंदे याचा नॅशनल अबॅकस स्पर्धेत पहिला क्रमांक.
धुळे,प्रतिनिधी.(२०.डिसेंबर.) : गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील मिळून 1100 विद्यार्थ्यांमध्ये धुळे येथील पल्स अबॅकस अकॅडमीचा विद्यार्थी चि.अर्णव चेतन शिंदे याचा अबॅकस स्पर्धेतील फर्स्ट लेवल मध्ये पहिला क्रमांक आला आहे. त्याला ट्रॉफी,मेडल आणि सर्टिफिकेट मिळाले.ही स्पर्धा दर सहा महिन्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. यावेळी ही स्पर्धा धुळे येथे संपन्न झाली.
धुळ्यातील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर चेतन सुभाष शिंदे यांचा तो मुलगा असून,त्याला पल्स अबॅकस अकॅडमीचे संचालक दिनेश बागुल सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अर्णवच्या यशामागे त्याची आई सौ.हेमांगी चेतन शिंदे यांची विशेष भूमिका आहे.अर्णव कनोसा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असून त्याचे सर्व स्तरांमधून विशेष कौतुक होत आहे.