श्रीमती कमलाबाई गंगाराम विद्ये यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

 श्रीमती कमलाबाई गंगाराम विद्ये यांचे दुःखद निधन.

नगर,प्रतिनिधी. (31. डिसेंबर.) : श्रीमती कमलाबाई गंगाराम विद्ये.(वय - 82 वर्षे )यांचे आज दुःखद निधन झाले असून उद्या दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वा.त्यांची  राहत्या घरापासून ( सातभाई गल्ली, चितळे रोड येथून ) अंत्ययात्रा निघणार आहे. अमरधाम नालेगाव येथे सकाळी 11 वाजता अंत्यविधी होणार आहे.

श्रीमती कमलाबाई विद्ये ह्या माजी उपनगराध्यक्ष गंगाराम विद्ये यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे दोन मुले गणेश व  श्याम असे असून तिन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पंचम हॉटेल चे संचालक गणेश विद्ये यांच्या त्या मातोश्री आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top