वसंत टेकडी अर्बन बँक कॉलनीत पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ.

Ahmednagar Breaking News
0

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून प्रभाग दोनसाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणणार - निखिल वारे.

वसंत टेकडी अर्बन बँक कॉलनीत पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ.

नगर, प्रतिनिधी. (१६. डिसेंबर.) : प्रभाग क्र.2 मधील नगरसेवक विनित पाउलबुधे, रुपालीताई वारे, संध्याताई पवार, सुनिल त्र्यंबके हे मनपाच्या माध्यमातून अनेक विकास कामे करीत आहेत. प्रभाग मोठा असल्याने निधी कमी पडतो, मनपाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने निधी  मिळण्यास अडचणी येतात. यामधून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून  मोठा विकास निधी उपलब्ध करुन देणार आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.

नगर-औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी अर्बन बँक कॉलनीत पेव्हींग ब्लॉक कामाचा शुभारंभ श्री.वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी श्री.वारे बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार, सुरेश रासकर, वसंत चव्हाण, अशोक मुनोत, रविंद्र पाखले, नवनाथ सोलाट, अनिल घाणेकर, सुभाष भंडारी, सदाशिव यादव, सोमनाथ खामकर, अर्जुन आठरे आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.वारे म्हणाले, प्रभागाच्या विकासासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य आहे. विकासनिधी मिळविण्यासाठी मुंबई दरबारी पाठपुरावा सुरू असुन त्यास लवकरच यश मिळेल असा विश्वास श्री.वारे यांनी व्यक्त केला. या विकास निधी मुळे प्रभागातील विकास कामांना चालना मिळेल. सुजयदादा व संग्रामभैय्या यांनी शहर विकासासाठी व प्रभागासाठी मोलाचे सहकार्य मिळत आहे. असे श्री. वारे यांनी सांगितले.

दिनकर लिपाने यांनी आपल्या भाषणातून  प्रभाग दोनच्या विकासासाठी चारही नगरसेवक सतत कटिबद्ध असतात. निखिल वारे यांचे त्यांना सहकार्य मिळते. शहर विकासासाठी खासदार विखे, आमदार जगताप एकत्र येतात. त्यामुळेच नगरच्या उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण झाले. प्रभागातील कामांसाठी त्यांच्या सहकार्यामुळे प्रभागाचा विकास झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे, असे ते म्हणाले.

नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार यांनी आपली मनोगत व्यक्त केली. नागरिकांनी या सर्वांचे आभार मानले. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top