प्रेमदान चौकातील म्हाडाच्या गाळ्यांना नगरकरांनी दिला भरभरून प्रतिसाद.गोरख कडूस.म्हाडा,सहाय्यक वसुली अधिकारी.
नगर,प्रतिनिधी.(०९.डिसेंबर.) : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत (म्हाडा.) यांच्या प्रेमदान चौकातील व्यावसायिक 40 गाळ्यांसाठी 10 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत निविदा विक्री होती.आज शेवटच्या दिवसा अखेर 3738. निविदा विक्री झाल्या आहेत.1 निविदा प्रिंटिंग मिस्टेक मुळे बाद करण्यात आली आहे.आज शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निविदा घेण्यासाठी गर्दी केली होती. आमच्या अपेक्षा पेक्षा मोठया प्रमाणात निविदा विक्री झाल्या आहेत असे म्हाडाचे सहाय्यक वसुली अधिकारी गोरख कडूस यांनी ए.बी.एन.शी बोलताना सांगितले.
12 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.30.पर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 2.00 पासून सावेडीतील माऊली सभागृह येथे इन कॅमेरा व सरकारी पंचा समक्ष निविदा उघडल्या जाणार आहेत. तरी ज्या नागरिकांनी म्हाडाच्या व्यावसायिक गाळ्यांसाठी निविदा घेऊन गेले आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी आणि वेळेवर हजर राहून सहकार्य करावे,असे म्हाडाच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.