महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा समितीच्या वतीने अभिवादन.
नगर प्रतिनिधी.अहमदनगर (०६. डिसेंबर.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा कृती समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व भीम वंदना घेण्यात आली यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून या कामासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली असून लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी हे काम पूर्ण करावे अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती त्यामुळे जयंती पूर्वीच पूर्ण कृती पुतळ्याचा लोकार्पण होणार असून येणाऱ्या जयंतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्ण कृती पुतळा उभा राहणार असल्याची भावना समितीच्या वतीने करण्यात आली आहे.