आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या संदर्भात बैठक संपन्न.

Ahmednagar Breaking News
0

आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या संदर्भात बैठक संपन्न.

अहमदनगर,प्रतिनिधी.(५. डिसेंबर) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शासकीय विश्रामगृह येथे आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात बैठक संपन्न झाली.यावेळी आमदार संग्राम जगताप,आयुक्त डॉ.पंकज जावळे,इंजि.परिमल निकम, इंजि.सुरेश इथापे,कृती समितीचे सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड,अजय साळवे,सुमेध गायकवाड, सुनील क्षत्रे,सुनील शिंदे,बंडू आव्हाड,विशाल गायकवाड,प्रतीक बारसे,योगेश साठे, संजय जगताप,किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, कौशल गायकवाड,विशाल भिंगारदिवे,विजय भांबळ, विशाल गायकवाड,संजय कांबळे, योगेश थोरात,सुरेश भिंगारदिवे,गौतमीताई भिंगारदिवे, अशोक देवडे आदी उपस्थित होते.

          या बैठकीत कृती समितीच्या वतीने पुतळा लवकरात लवकर उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले की लवकरात लवकर पुतळा उभारण्यासाठी डिझाईन निश्चित करून पुतळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून येणाऱ्या १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.यावेळी कृती समितीच्या वतीने आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top