नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांचे आरोग्य सेवेतील कार्य कौतुकास्पद.- आमदार संग्राम जगताप
नगर, प्रतिनिधी.समाजामध्ये दिवसेंदिवस आरोग्याचे विविध प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. नवनवीन आजारपणाचे संसर्ग नागरिकांमध्ये फोफावत आहे. सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधांचा लाभ व्हावा यासाठी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे.यासाठी विविध संस्थांनी पुढे येऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करावी जेणेकरून गरजू रुग्णांच्या आरोग्य तपासणीतून वेळेवर आजारपणाचे निदान करता येईल.
नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी कोरोना संकट काळामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपायोजना केल्या आहेत.त्यांच्या आरोग्य सेवेतील कार्य कौतुकास्पद आहे.विकास कामांबरोबर नागरिकांचे सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम केले जाते. आरोग्य सुविधेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरीक आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आजारपणाकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असतात यासाठी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे,असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या वतीने आयोजित-५ वे मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेविका मीना चव्हाण, बाळासाहेब बारस्कर,उद्योजक अमोल गाडे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक सुनील त्रिंबके, सुमित कुलकर्णी,रंजना उर्किडे, साधना बोरुडे,आदींसह नागरिक उपस्थित होते.
नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.यामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली. नागरिकांना शहरांमधील हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे,यासाठी आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले आहे.प्रभागातील नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी डजबीन व कापडी पिशवीचे वाटप केले गेले आहे असे ते म्हणाले.