सराईत आरोपीसह बेकायदेशीररित्या गावठी कट्टे बाळगणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद.

Ahmednagar Breaking News
0

तब्बल सतरा गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीसह बेकायदेशीररित्या गावठी कट्टे जवळ बाळगणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद.

अहमदनगर प्रतिनिधी (दि.९. डिसेंबर) : कोल्हार,ता.राहाता येथे विक्री करण्याचे उद्देशाने तिन (03) गावठी कट्टे व तिन (03) जिवंत काडतुस बेकायदशिररित्या कब्जात बाळगणारे पाच सराईत आरोपी 91,500/- रु. (एक्याणव हजार पाचशे रु.) किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थागुशा यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, राजवाडा परिसर,गौतमनगर, कोल्हार बुा,ता.राहाता येथे काही इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी येणार आहेत आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सफौ/मनोहर शेजवळ,भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके,देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी,संदीप चव्हाण,लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे,राहुल सोळुंके, पोकॉ/रणजीत जाधव, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व भरत बुधवंत अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने राजवाडा परिसर, गौतमनगर,कोल्हार बुा,ता. राहाता येथे जावुन चिंचेच्या झाडा जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना चार ते पाच इसम एकमेकांशी चर्चा करताना दिसले.बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम असल्याची पथकाची खात्री होताच संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना ते पळुन जावु लागले लागलीच पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले व पोलीस पथक असले बाबतची ओळख सांगुन त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्याचे नावे 1) दुर्गेश बापु शिंदे वय 35, रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.7, ता. श्रीरामपूर, 2) हारुण ऊर्फ राजु रशिद शेख, वय 31,रा.अहिल्यादेवी नगर, वॉर्ड नं.2,ता.श्रीरामपूर, 3) अश्पाक ऊर्फ मुन्ना रफिक पटेल, वय 21, रा. बेलापुर रोड, शहानगर, कोल्हार बुा, ता. राहाता, 4) प्रसन्न विलास लोखंडे, वय 32, रा. गौतमनगर, राजवाडा, कोल्हार बुा,ता. राहाता, 5) सदानंद राजेंद्र मनतोडे, वय 27, रा. शिबलापुर, ता. संगमनेर असे असल्याचे सांगीतले.त्यांची अंगझडती घेता अंगझडतीमध्ये तीन (03) गावठी बनावटीचे कट्टे व तीन (03) जिवंत काडतूस मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

            ताब्यातील पाचही इसमांकडे गावठीकट्टे व काडतुस बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले.त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन तपास केला असता त्यांनी सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे विक्री करीता आणल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपींकडे तीन (03) गावठी कट्टे व तीन (03) जिवंत काडतूस असा एकुण 91,500/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत पोना/37 संदीप विनायक चव्हाण ने. स्थागुशा,अहमदनगर यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 620/2022 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन,पुढील कायदेशिर कार्यवाही लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे दुर्गेश बापु शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, पुणे,नाशिक, जालना, सोलापुर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दरोडा तयारी,जबरी चोरी,घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत व आर्म ऍ़क्ट प्रमाणे एकुण -17 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. श्रीरामपुर शहर 175/2011 भादविक 379

2. श्रीरामपुर शहर 177/2011 भादविक 379

3. श्रीरामपुर शहर 188/2011 भादविक 379

4. श्रीरामपुर शहर 379/2012 भादविक 457,380,379,34

5. श्रीरामपुर शहर 204/2013 भादविक 394,363

6. करमाळा, जिल्हा सोलापुर 06/2014 आर्म ऍ़क्ट 3,7/25

7. श्रीरामपुर शहर 126/2015 मपोका 122

8. श्रीरामपुर शहर 30/2015 भादविक 194,341

9. श्रीरामपुर शहर 226/2017 भादविक 324,323,504,506

10. श्रीरामपुर शहर 84/2018 आर्म ऍ़क्ट 4/25

11. श्रीरामपुर शहर 13/2018 आर्म ऍ़क्ट 3,7/25

12. वाकड, जिल्हा पुणे 757/2019 भादविक 399,402

13. वावी, जिल्हा नाशिक 660/2020 भादविक 323,324,504

14. राजगड, जिल्हा पुणे 627/2020 आर्म ऍ़क्ट 3/25

15. खेड, जिल्हा पुणे 11/2021 आर्म ऍ़क्ट 3/25

16. सदर बाजार,जालना 610/2021 आर्म ऍ़क्ट 3,4/25

17. लोणी 620/2022 आर्म ऍ़क्ट 3/25, 7

आरोपी नामे दुर्गेश बापु शिंदे यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दोन अजामिनपात्र अटक वॉरंट आहेत.तसेच नमुद आरोपी सदरबाजार पोलीस स्टेशन,जिल्हा जालना यांचेकडील गु.र.नं. 610/2021 आर्म ऍ़क्ट 3/25 व 4/25 मध्ये फरार आहे.आरोपी नामे प्रसन्न विलास लोखंडे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व लोणी पोलीस स्टेशन येथे खुन व आर्म ऍ़क्ट प्रमाणे गंभीर स्वरुपाचे एकुण -02 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. राहुरी 427/2016 भादविक 302, 323, 143,427

2. लोणी 620/2022 आर्म ऍ़क्ट 3/25, 7

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री. संजय सातव उविपोअ शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top