युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.ने अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास दिला 15 लाखाचा धनादेश.
नगर,प्रतिनिधी.(27. जानेवारी.) : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.अहमदनगर कार्यालयाकडे सी क्यू ए व्ही सिव्हिलियन सेवकांची सह.पतसंस्था मर्यादित अहमदनगर, या पतसंस्थेने कर्मचारी,अधिकारी,सभासदांचा 15 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला होता. त्यापैकी एका सभासदाचा कै. गणेश थोरात यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सदर पतसंस्थेकडे 15 लाख रुपयांचा विमा क्लेम तत्काळ मंजूर करून चेक सुपूर्त करताना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अमर गुरप व शिवाजीराव मोरे. यावेळी थोरात यांच्या पत्नी,पत्नीचे बहीण,भाऊ,पतसंस्थेचे चेअरमन जासूद, सचिव जगताप व इतर संचालक मंडळ उपस्थित होते.