राज्यातील 80 हजार होमिओपॅथी डॉक्टरांच्या वतीने सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा.
नगर, प्रतिनिधी. (26. जानेवारी.) : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना राज्यातील 80 हजार होमिओपॅथी डॉक्टरांच्या वतीने आज जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला.यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा सत्कार करण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टर्स कृति समितीचे डॉ.विजय पवार, डॉ. सोमीनाथ गोपाळघरे,डॉ.प्रशांत शिंदे,डॉ. अशोक भोजने, डॉ. सुबोध देशमुख,डॉ.श्रीराम शिरसाट, डॉ. किरण कर्डिले, डॉ.रवींद्र सातपुते, डॉ.पी.एस.आहूजा, डॉ.दीपक कारखिले,डॉ.रणजीत सत्रे, डॉ.रोहित करांडे,डॉ.गणेश गावडे, डॉ.दिनेश मेहत्रे, डॉ. अर्जुन घुले आदींसह डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2023 मध्ये कृति समितीने आझाद मैदानावर पुकारलेल्या उपोषणाच्या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे यशस्वी शिष्टाई केली होती. याच कारणामुळे राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न सुटण्यासाठी मोठी मदत झाली. ही आठवण कृती समिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी आवर्जून केली. येत्या काळात राज्यातील 80 हजार होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने सोडवण्याची ग्वाही डॉ.सुधीर तांबे यांनी दिली.महाराष्ट्र राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या कृति समितीच्या वतीने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी जाहीर पाठींबा दर्शवत नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृति समिती निवडणुकीमध्ये आपणासोबत असल्याचे जाहीर करण्यात आले.