खंडणीसाठी तीन जणांचे अपहरण करणाऱ्या टोळीला बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.

Ahmednagar Breaking News
0

खंडणीसाठी तीन जणांचे अपहरण करणाऱ्या टोळीला बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.

नगर,प्रतिनिधी.(१३.जानेवारी) : पुणे जिल्ह्यातील मार्केटयार्ड परिसरातून 50,00,000/- (पन्नास लाख) रुपये खंडणी करीता तीन इसमांचे अपहरण करणारे आरोपी 12 तासाचे आत जेरबंद करण्यात व अपहरत इसमांची सुखरुप सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

           बातमीची हकिगत अशी की,दि.12/01/2023 रोजी फिर्यादी श्री.विवेकसिंग अनिलकुमार सिंग राजपुत (वय 23,धंदा बांधकाम व्यवसाय,रा.वसंतविहार, साकीनाका मुंबई) यांनी त्यांचे भाऊ नामे हर्षप्रताप महेंद्रप्रताप सिंग राजपुत व त्याचे इतर दोन साथीदार यांचे 50,00,000/- (पन्नास लाख) खंडणी करीता मार्केटयार्ड परिसर,जिल्हा पुणे येथुन किडनॅप (अपहरण) केले आहे.अपहरण करणारे इसमांना पैसे न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देवुन मारहाण करत आहे. सदर घटनेबाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं.12/2023 भादविक 363,364 (अ),384,386, 387,34 प्रमाणे अनोळखी इसमां विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्या नंतर खंडणी विरोधी पथक,युनिट-2,पुणे शहर हे सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना त्यांना सदर गुन्ह्यातील आरोपींनी अपहरत व्यक्तींना दौंडमार्गे-अहमदनगरचे दिशेने घेवुन गेले आहे अशी माहिती प्राप्त झाली.सदर माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर यांचेशी संपर्क करुन सदर घटनेची हकिगत सांगुन आरोपींचा व अपहरत इसमांचा शोध घेणे बाबत कळविले.श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,यांनी लागलीच पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना प्राप्त माहिती सांगुन आरोपी व अपहरत इसमांचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे,पोसई/सोपान गोरे,सफौ/मनोहर शेजवळ,पोहेकॉ/सुनिल चव्हाण,बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके,देवेंद्र शेलार, विश्वास बेरड,पोना/शंकर चौधरी,भिमराज खर्से,रवि सोनटक्के,विशाल दळवी, संतोष लोढे,पोकॉ/योगेश सातपुते,जालिंदर माने व विनोद मासाळकर अशांचे पथक नेमुन आरोपी व अपहरत इसमांचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने लागलीच अहमदनगर ते दौंड रोडने जावुन जावुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, राजश्री हॉटेल,नगर दौंड रोड, काष्टी,ता.श्रीगोंदा येथे हॉटेलच्या रुममध्ये काही इसमांना डाबुन ठेवलेले आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.पोनि/कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.पथक हॉटेल परिसरात संशयीत इसमांबाबत माहिती घेत असतांना आरोपींना पोलीस पथकाची चाहुल लागली व ते राजश्री हॉटेलचे पाठीमागिल बाजुने पळुन जावु लागले पथकाने संशयीत आरोपींचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)विशाल बबनराव मदने वय 32,रा.वांगदरी, ता. श्रीगोंदा 2) विजय लक्ष्मण खराडे वय 38,रा.श्रीगोंदा फॅक्टरी,ता.श्रीगोंदा व 3) प्रविण रंगनाथ शिर्के वय 38, रा.बाबुर्डी,ता.श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे मार्केटयार्ड परिसर, जिल्हा पुणे येथील अपहरत इसमांबाबत विचारपुस करता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने तपास करता त्यांनी त्यांचे इतर साथीदारासह मार्केटयार्ड परिसर,पुणे येथुन अपहरण केलेल्या इसमांना राजश्री हॉटेलमध्ये ठेवले आहे अशी कबुली दिल्याने राजश्री हॉटेलमध्ये जावुन खात्री करता राजश्री हॉटेलचे दुस-या मजल्यावरील रुममध्ये काही इसम घाबरलेल्या स्थितीत बसलेले दिसुन आले त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी 1)हर्षप्रताप महेंद्रप्रताप सिंग राजपुत,वय 23,रा.साकीनाका,मुंबई, 2) प्रतिष नवनाथ जगदाळे,वय 34, रा.शरदनगर चिखली, जिल्हा पुणे व 3) किसनकुमार रामकुमार गुप्ता, वय 24,रा.साकीनाका,मुंबई असे सांगितले.अपहरत इसम हेच असल्याची पथकाची खात्री झाल्याने आरोपी व अपहरत इसमांना ताब्यात घेवुन खंडणी विरोधी पथक, युनिट-2, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आरोपींचे इतर साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही.पुढील तपास खंडणी विरोधी पथक, युनिट-2, पुणे शहर हे करीत आहेत.आरोपी नामे प्रविण रंगनाथ शिर्के हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात अपहरण,चोरी व गंभीर स्वरुपाची दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण -03 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1)श्रीगोंदा पोलीस स्टेशन 308/2008 भादविक 143, 147, 148, 324, 341, 504, 506

2)श्रीगोंदा पोलीस स्टेशन 1066/2019 भादविक 379 सह पर्या.का.क. 3, 15

3.)मार्केटयार्ड,जिल्हा पुणे 12/2023 भादविक 363, 384, 364 (अ),367, 368, 34

आरोपी नामे विशाल बबन मदने हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात अपहरण व मोटार अपघात असे गंभीर स्वरुपाचे एकुण -02 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1) शिक्रापुर जिल्हा पुणे 277/22 भादविक 279, 338, 337, 427 मो.वा.का.क. 184

2)मार्केटयार्ड, जिल्हापुणे 12/2023 भादविक 363, 384, 364 (अ),367, 368, 34

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधीकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top