शहर भाजपाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

Ahmednagar Breaking News
0

स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म जगात पोहोचवला - भैय्या गंधे.

नगर, प्रतिनिधी. (12. जानेवारी.) : स्वामी विवेकानंद हे युवक व युवतींंचे प्रेरणास्थान आहेत. स्वामींच्या जीवनात संयम, सराव याला खूप महत्त्व होते. स्वामींच्या नियमांचे अनुसरण करून तुमचे जीवन अधिक आनंदी करू शकता. स्वामींचा सल्ला व नियम सर्वोत्तम आहेत. त्यांचे विचारांचे नियमित अनुसरण करा. त्यांचा उद्देश मानवजातीची उन्नती होता. हिंदुस्थानच्या राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी नेहमीच कार्य केले. रामकृष्ण परमहंस परमोच्च शिखरावर असले तरी त्यांना ज्ञात असलेले सत्य आणि हिंदूधर्म जगापर्यंत पोहोचवायचा होता, याचे खरे काम विवेकानंदांनी केले. स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.

     भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. गंधे बोलत होते. याप्रसंगी सुनील रामदासी, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, अजय ढोणे, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, अनिल सबलोक, बाळासाहेब भुजबळ, लक्ष्मीकांत तिवारी, श्रीकांत फंड, धनंजय रामदासी, नितीन जोशी, प्रताप परदेशी, महावीर कांकरिया, जालिंदर शिंदे, मल्हार गंधे आदी उपस्थित होते.

      श्री. गंधे पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशन'ची स्थापना करून संपूर्ण भारतात आणि विश्वात सत्याचा व धर्माचा प्रचार केला. खूप कमी वेळेत त्यांनी योग व वेदानंचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगात केला. हिंदूधर्म म्हणजे नुसते पारंपारिक ग्रंथ नसून अखिल मानव जातीने अनुभवलेले अध्यात्मातील परमोच्च शिखर आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे, असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top