नायलॉन चायना मांजाची विक्री करणाऱ्यांवर भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई.
नगर,प्रतिनिधी.(१४.जानेवारी) : महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला नायलॉन चायना मांजा भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडला. सोलापूर रोडवर बांधकाम चालू असलेल्या घरामध्ये ही कारवाई केली.पोलिसांनी पांडुरंग रंगनाथ गाडळकर (रा.सोलापूर रोड गाडळकर मळा सारसनगर) यास ताब्यात घेतले आहे. गाडळकर यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजा गुंडाळलेले तीस प्लास्टिक रीळ जप्त केले आहे.पोना/राहुल राजेंद्र द्वारके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प मध्ये भादंविक 188 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि/शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/बेडकोळी,सफौ/कैलास सोनार,पोना/राहुल द्वारके, पोकॉ/अमोल आव्हाड,पोकॉ/अरुण मोरे,यांनी केली आहे.